Akola Accident News : बच्चू कडू (Bacchu Kadu) आज अकोला (Akola) जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मूर्तिजापूर मतदारसंघात (Murtijapur Constituency) दौऱ्यावर असताना बच्चू कडू हे अपघातग्रस्त (Accident) व्यक्तींच्या मदतीसाठी धावून गेल्याचं पाहायला मिळालं. बच्चू कडू यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केलं.  दरम्यान, रुग्णसेवा व प्रहारचे नाते अतुट आहे. बच्चू कडू हे अकोल्यात मुर्तीजापुर मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी ही अपघाताची घटना घडली.
 
अकोल्यातल्या मुर्तिजापुर आणि पिंजर रस्त्यावर हा अपघात झाला होता. प्रचार दौरा मागे ठेऊन बच्चू कडू यांनी अपघातातील जखमींच्या मदतीसाठी दावले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बच्चू कडू पुढील दौऱ्यासाठी निघून गेले. सध्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या काळात सर्वच राजकीय नेते प्रचारात दंग आहेत. येत्या 20 तारखेला विधानसबा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.