Amol Mitkari on Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार टीका केली आहे. आव्हाडांच्या वक्तव्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं समर्थन आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. यासोबतच आव्हाडांचं वक्तव्य अजित पवारांच्या आई-वडिलांचा अपमान करणार आहे. त्यामुळं शरद पवार आणि सुप्रिया सुळे आता जोडे मारुन आव्हाडांचं थोबाड फोडणार का? असा सवालही आमदार मिटकरींनी केलाय.
आव्हाडांच्या वक्तव्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं समर्थन आहे का?
जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला त्यांच्या मुंब्र्यात येऊन उत्तर देणार असल्याचं प्रतिआव्हानही आमदार मिटकरींनी आव्हाडांना दिलं आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्या संदर्भात भूमिका घेणाऱ्या भाजपने धर्म पाळावा असा आवाहन आमदार मिटकरी यांनी भाजपाला केलं. खालच्या भाषेत बोलणं ही आव्हांडांची संस्कृती असल्याचे मिटकरी म्हणाले. आमच्यावर आमच्या आई-वडिलांचे आणि पक्षाचे तसे संस्कार नाहीत. आव्हाडाचं वक्तव्य हे अजित पवारांच्या आई-वडिलांचा अपमान करणारं असल्याचे मिटकरी म्हणाले. आव्हाडांच्या वक्तव्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं समर्थन आहे का? असा सवालही मिटकरींनी उपस्थित केला आहे.जर समर्थन नसेल तर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी आव्हाडांचं थोबाड फोडावं. आव्हाडांना त्यांच्या कळवा मुंब्र्यात येऊनच उत्तर देणार असल्याचे मिटकरी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
अजित पवारांनी हिंमत असेल तर नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असं आव्हान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलं आहे. चोरांच्या टोळीपासून सावध राहा असाही सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे. अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना (Sharad Pawar) बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं अशी टीका देखील आव्हाडांनी केली होती. ठाण्यातील चंदननगर मुंब्रा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि आर्थिक सहाय्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात महंगाई वाढली त्यात सरकारची तिजोरी देखील रिकामी बदलापुर हत्याकांडावर भाजपा सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. मतदात्यांना जागरूक राहून जुल्मी विरोधी लढाईत सहभागी होण्याचं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं, चोरांच्या टोळीपासून सावध राहा, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल