शिर्डी : दारूची नशा तरूणाच्या जीवावर बेतली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून शिर्डीला (Shirdi) आलेल्या भाविकाचा दारूच्या नशेत हॉटेलच्या टेरेसवरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम नारखेडे (Shubham Narkhede) असे मयत तरुणाचे नाव आहे. यामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथे साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनाला दररोज हजारो भाविक देशभरातून दर्शनासाठी येत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील चार मित्र शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांनी शिर्डीनजिक निमगाव कोऱ्हाळे येथील एक हॉटेलमध्ये रूम बुक केली. या हॉटेलमध्ये त्यांनी दारू पार्टी केली.
हॉटेलच्या टेरेसवर पडल्याने तरुणाचा मृत्यू
दारू पार्टी झाल्यानंतर शुभम नारखेडे (25, रा. शेंभा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) हा तरुण हॉटेलच्या टेरेसवर गेला असता दारूच्या नशेत त्याचा टेरेसवरून खाली पडल्याने मृत्यू झाला. शिर्डी नजिक निमगाव कोऱ्हाळे येथील हॉटेल साई सिमरन येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या