Nilesh Lanke vs Sujay Vikhe Patil : भाजपकडून काही दिवसांपूर्वी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी (Ahmednagar South Lok Sabha Constituency) सुजय विखे पाटील (Sujay VIkhe Patil) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. महाविकास आघाडीकडून सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधला जात होता.


आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश लंके यांनी कालच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता निलेश लंके विरुध्द सुजय विखे पाटील (Nilesh Lanke vs Sujay Vikhe Patil) अशी लढत होणार आहे. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिली उमेदवारी जाहीर


वर्धा - अमर काळे
दिंडोरी - भास्करराव भगरे
बारामती - सुप्रिया सुळे
शिरुर - डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर - निलेश लंके


काय म्हणाले निलेश लंके? 


उमेदवारी जाहीर झाल्यावर निलेश लंके यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी मला जाहीर केली. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेणार आहे. या मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न, पाण्याचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न समोर ठेवत आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. 


निवडणूक हा खेळ


तुमच्या समोर सुजय विखे पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला आव्हान वाटते का? असे विचारले असता निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले की, कुठलीच निवडणूक आव्हान नसते. निवडणूक हा खेळ आहे. तो आनंदाने खेळायचा असतो. मी कुणावर कधीही व्यक्तिगत टीका केलेली नाही. निवडणुकीचा खेळ हा समाजासाठी खेळायचा असतो. आमचा विजय 100 टक्के होणार आहे, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sujay Vikhe Patil vs Nilesh lanke : लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेंचं आव्हान वाटतं का? सुजय विखे पाटलांचं रोकठोक उत्तर!


Nilesh Lanke : कंठ दाटला, डोळे पाणावले, राजीनाम्याची घोषणा करताना निलेश लंके भावूक