संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंत देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला होता. वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आज अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी संगमनेरमध्ये मेळावा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधलाय. 


राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचा सन्मान करणारं महायुतीचं सरकार आहे.केवळ घोषणा देऊन मतं मिळत नाही. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम सरकारने केलंय. सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे. त्याची प्रचिती आता यायला लागलीय. तिसऱ्यांदा मोदींना लोकांनी पंतप्रधान केलं. बदलापूर आणि संगमनेरसह इतर ठिकाणी घडलेल्या घटनेला आघाडी जबाबदार आहे. महा युतीला बदनाम करण्याचं काम सध्या सुरू आहे, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 


राजकीय दहशतवाद इथे निर्माण केला जातोय


दांडकाई करणाऱ्यांना, वाळूवाल्यांना तुम्ही घाबरला का? मग का तुम्ही निषेधाचे बोर्ड लावले नाही. राजकीय दहशतवाद इथे निर्माण केला जातोय. स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांची इथे पिलावळ आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी काँग्रेस बाळासाहेब थोरातांवर टीका केली.  


सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं


उमेदवार कोणताही असो युती म्हणून भूमिका घ्या. दहशतवादाविरोधात आपली लढाई आहे. संगमनेर विधानसभेत उमेदवार कोण हे पाहू नका. वसंतराव देशमुख यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही. त्याचा निषेध मी केलाय. मात्र पंधरा मिनिटात मारणारे कसे जमा होतात? हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुजय विखेच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....


Jayshree Thorat: जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य म्हणाल्या, 'आचारसंहिता भंग...'