Jayshree Thorat: संगमनेरममध्ये वादग्रस्त प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये महिला नेत्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटल्याचं दिसून आलं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता सुरू असतानाच जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल(शनिवारी) संगमनेर तालुका पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. त्यामुळे जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली चाकणकर वसंत देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत बोलताना म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्यावतीने जाहीर निषेध करतो. याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाला देण्याचे आदेश दिले आहे. याबाबत कारवाई व्हावी. तर जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोणतीही घटना घडली की लाडकी बहीणीशी त्याचा संबंध जोडला जातो. प्रत्येक स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली जाते. कोणी महिलेच्या सन्मानाला ठेच पोहचवत असेल असं वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तपास अधिकारी या प्रकरणाता तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये संत देशमुखांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबतचे राज्यभरात पडसाद उमटले. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेत बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरांतांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर थोरात समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सुजय विखेंच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हणत जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
भाऊसाहेब थोरात यांची नात, ती तर बोलती म्हणत्यात, माझा बाप सगळ्याचा बाप आहे, काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य वसंतराव देशमुखांनी केलं होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचबरोबर पोलिसांनी वसंतराव देशमुखांना नगरबाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे.