अहमदनगर: भाजप उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली, मात्र आता त्यांचं नाव घेणे योग्य ठरणार नाही असं म्हणत त्यांनी गौप्यस्फोट देखील केला. तसेच आता दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहे. शरद पवार (Sharad Pawar) मला दिल्ली शिकवणार असल्याचे निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले. विजयानंतर ते नगरमध्ये माध्यमांशी बोलत होत.
निलेश लंके म्हणाले, विजयानंतर पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबत माझं फोनवरून बोलणं झाले आहे. मी त्यांना भेटण्यासाठी कधी येऊ विचारले असता ते दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितल. तसेच त्यांनी मला दिल्ली शिकवतो असं म्हटलं आहे.आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण देखील करणार आहे.
सुजय विखेंच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली : निलेश लंके
दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विजयाच्या जवळ आल्यानंतर त्यांनी मतमोजणी केंद्रात येऊन कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष केला. हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे. भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले. सोबतच आता कुणाबद्दलही काहीही बोलायचे नाही असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.
पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणार : निलेश लंके
सर्वसामान्य जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलाय म्हणून तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढील पाच वर्षांनी त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे म्हणत शेतकरी सुखी झाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे आणि माझ्या मतदारसंघात पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी उद्यापासूनच कामाला लागणार आहे. तर विजयाचे श्रेय हे महाविकास आघाडीतील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना देत असल्याचे म्हणत ही निवडणूक खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाने देखील हातात घेतली.
सुजय विखेंचा दणदणीत पराभव
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत (Ahmednagar Lok Sabha Election) भाजपचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत निलेश लंकेनी विजय मिळवला असून सुजय विखेंचा दणदणीत पराभव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके 29317 मतांनी विजयी झाले आहे.
हे ही वाचा :
Ahmednagar Lok Sabh Election Results Live : फाडफाड इंग्रजी बोलता आलं नाही, पण धाडधाड मतं पडली; अहमदनगरमध्ये निलेश लंके विजयी, सुजय विखेंवर पराभवाची नामुष्की