Nagar Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच खुमासदार भाषणशैलीसाठी म्हणून ओळखले जातात. अनेकदा भाषणात विनोद करून वातावरण खुलवून टाकतात. सध्या त्यांचे असेच एक भाषण चांगलेच व्हायरल झाले असून नखावर नख घासायचे, कुणी रामदेवबाबांनी (Ramdev baba) सांगितले का? असं केल्याने केस वाढत नाहीत. उलट डोक्यावरचे केस निघून गेलेत, असं अजित पवार म्हणाले, त्यानंतर मंडपात एकच हसा पिकला. 


अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये (Farmers Melava) विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी भाषण सुरु असताना ते म्हणाले की, तुम्ही नखाला नख घासता ते रामदेव बाबांनी सांगितले म्हणून करता ना. रामदेव बाबांनी सांगितले, नखाला नख घासा. मी केलं पण माझी सगळी केस गेली. नवीन केस यायची तर बाजूलाच राहिली असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी डोक्यावरची केस गेलेली केसही दाखवले, अजित पवारांची कृती पाहून उपस्थितामध्ये एकच हास्यकल्लोळ माजला. 


शेतकरी मेळाव्यात आलेला शेतकरी अजित पवारांचे भाषण सुरू असताना नखावर नख घासत होता, हे दृश्य पाहून तुम्हाला हे नखावर नख घासायचे कुणी रामदेवबाबांनी सांगितले का? असं केल्याने केस वाढत नाहीत उलट डोक्यावरचे केस निघून गेलेत असं अजित पवार म्हणाले त्यानंतर मंडपात एकच हसा पिकला. यावर अजित पवार म्हणाले, बुवा लोकांचे अजिबात ऐकू नका, साधू संतांचे ऐका.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांचे ऐका. मौलाना आझाद असतील, शाहू फुले आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील. या सर्व महान लोकांचे ऐका. पण बुवाबाजी करणाऱ्यांची ऐकू नका. त्यांचे  ऐकून तिसरेच काहीतरी व्हायचे आणि मग डॉक्टरकडे जावे लागेल. डॉक्टर म्हणेल हे कोणी करायला लावलं. पुन्हा डॉक्टरचा खर्च करावा लागेल. 


साखर एक्सपोर्टसाठी परवानगी द्या..


देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितले की साखर एक्सपोर्ट करायला परवानगी द्या, आजही श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये भारतातील साखर तस्करी होऊन जाते... तिथे साखरेचे दर फार जास्त आहेत , मग जर त्या लोकांना पैसे मिळतात तर ज्या शेतकऱ्यांनी कष्ट केले त्यांना पैसे मिळू द्याना असं राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. केंद्र सरकारने या गोष्टी केल्या तर शेतकऱ्यांना जास्त भाव देणे शक्य होईल असंही अजित पवार म्हणाले.