Nitesh Rane : 'ज्या प्रमाणात महाराष्ट्रात (Maharashtra) लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या घटना घडत आहेत, त्या प्रमाणात प्रशासनही सतर्क झालं आहे. परंतु आमच्याच प्रशासनातील काही लोक चुकत असल्याने त्यांची माहिती आम्ही ठेवतो आहोत. राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची आमची तयारी असून 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. कोणत्याही क्षणी तो कायदा येऊ शकतो, असा विश्वास आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला आहे. 


अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जन आक्रोश मोर्चाचे (Jan Akrosh Morcha) आयोजन केलं होते. गेल्या काही दिवसांपासून धर्मांतरण व लव्ह जिहादचा (love Jihad) आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. आठ दिवसांपूर्वी तीन अल्पवयीन मुलींनी तर दोन दिवसांपूर्वी दोन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार सुद्धा दाखल केली. तर काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत सुद्धा यासंदर्भात लक्षवेधी मांडण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मोर्चाच आयोजन करण्यात आले होते. यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे जन आक्रोश मोर्चा सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. 


आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले की, हिंदू राष्ट्राला सुरक्षित ठेवायचं काम आम्ही करत असून हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी जे जे करायला लागेल, ते कायदे सगळे येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच जो इथे राहतो, तो वंदे मातरम म्हणतो, अबू आझमीला हिंदू धर्मात यायचे असेल तर त्याचे स्वागत करू, पण आमच्या देशात राहायचे असेल तर तुम्हाला वंदे मातरम म्हणावेच लागेल, असा सज्जड दमही नितेश राणे यांनी दिला. 


अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही... 


तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक एसपी स्वाती भोर (SP Swati Bhor) यांची तक्रार आमच्याकडे आली असून त्यांना लवकरात लवकर निलंबित करण्याची मागणी केल्याचे राणे म्हणाले. आमच्या प्रसाद लाड यांनी राहुरी प्रकरणाला वाचा फोडली. आमची अपेक्षा होती की प्रशासनानं कारवाई करावी. मात्र त्या शिक्षिकेला पकडल्यानंतर तिला वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतात. हे काँग्रेसचे राज्य नाही किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही. प्रशासन विसरत असेल कोणाच राज्य आहे तर त्यांना रोज सकाळी गुडमॉर्निंगचे मेसेज पाठवतो. पोलीस खात्यातील मस्ती करणारे जे असतील, जे पोलिस दलाच नाव खराब करतात, त्यांना वाचवायला कोण येणार? इथल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक एसपी स्वाती भोर यांना कोण फोन करतय. मी सांगतो, मी फोन केले ते आमच्या मुलांना सोडविण्यासाठी, काय करायचे ते करा असे सांगत आमच्या सरकारची बदनामी होणार असेल तर अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. 


इतर संबंधित बातम्या : 


Hindu Jana Akrosh Morcha Rahuri : सकल हिंदू समाजाकडून राहुरीत जन आक्रोश मोर्चा, नितेश राणेही दाखल