अहमदनगर : राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Result) आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून छत्रपती संभाजीगनरमधील रेणुका बोरणीकरने 100 टक्के गुण मिळवत दैदिप्यमान यश मिळवलं आहे. यंदाच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून 91.51 टक्के निकालासह कोकण अव्वल आहे. तर, राज्यातील 12 वीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनीही प्रयत्नांची पराकाष्टा केल्याचं पाहायला मिळालं. अहमदनगरमधील अनामप्रेम संस्थेच्या अंध,अपंग व मुकबधिर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळ, पुणे आयोजित इयत्ता 12 वी च्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण 12 अंध, अपंग व मुकबधीर मुला-मुलीनी इ्यत्ता 12 वी ची परीक्षा दिली होती. 


बारावीच्या परीक्षेत संस्थेतील सर्वच दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील अनामप्रेमने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व गुण खालीलप्रमाणे.


1)श्रावणी बाबासाहेब वाळुंज(विज्ञान शाखा)- 76.33   


2)अमित संजय वैराळ
 (वाणिज्य शाखा) – 72.33


3) बापु विठ्ठल भोसले (कला शाखा) - 81.17
 
4) हर्षद देवराम पुंडगे
 (कला शाखा) – 77.17


5) सागर शालीग्राम पांडे
 (कला शाखा) - 75.00


6) सौरज बुधा शिंदे
(कला शाखा) – 75.00


7) आर्यन संजय बोचरे
(कला शाखा) - 72.33


8) स्नेहल संजय शिंदे
(कला शाखा) - 69.17


9) गणेश आत्माराम गुंड
 (कला शाखा) - 68.33


10) विलास धनाजी राठोड
(कला शाखा) - 67.17


11) साक्षी दादासाहेब ढवळे (कला शाखा) - 65.83


12) द्वारका मसनाजी जोरवर (कला शाखा) - 65.00


अनामप्रेम वसतिगृहातील या विद्यार्थ्यांच्या यशासाठी अंध मुलांचे वाचक म्हणून सौ. गीता महाजन, सौ. मिलन गंधे  यांनी विशेष मेहनत घेतली. तर, इंग्रजी विषयाच्या तयारीसाठी सौ.ज्योती पुरी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व विद्यार्थ्यांना रेसिडेन्शियल महाविद्यालयाचे प्राचार्य पोकळे सर, प्रा. जगधने सर, प्रा. सुंभे मॅडम व न्यू आर्ट्स कॉमर्स, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एच. झावरे सर, उपप्राचार्या दारकुंडे मॅडम, प्रा. नितीन दुधाडे सर, प्रा. किरण वाघमोडे सर, प्रा. करपे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.  
  
महाराष्ट्रातील गरजू व होतकरू दिव्यांग मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अनामप्रेम संस्थेने अहमदनगर शहर, निंबळक (ता. नगर), पुणे, व छ.संभाजीनगर येथील वसतीगृहात मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. या वसतिगृहात निवासाबरोबरच चहा, नाश्ता, जेवण, संगीत क्लास, संगणक क्लास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, इंटरनेट वगैरे सुविधा मोफत दिल्या जातात. गेल्या 19 वर्षापासून अनामप्रेमच्या वरील विविध निवासी प्रकल्पात एकूण 250 दिव्यांग मुले-मुली दरवर्षी राहतात व शिक्षण घेतात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक अनामप्रेमचे अध्यक्ष.इंजि.अजित माने, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ गिरीश कुलकर्णी, सी.ए.अशोक पितळे, रोटरी अध्यक्ष नितीन थाडे, डॉ.प्रकाश शेठ, डॉ.सायली सतीश सोमण, मा.राधाताई कुलकर्णी, मा.अभय रायकवाड मा.अमृत भुसारी, मा.विष्णू वारकरी मा. उमेश पंडूरे यांनी केले आहे. अनामप्रेमच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांनी कृपया 9011004576 किंवा 7350013847 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ मेघना मराठे यांनी केले आहे.