Ahmednagar Lok Sabha Constituency : महायुतीकडून (Mahayuti) अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून (BJP) डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar Faction) निलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी महायुतीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसरीकडे निलेश लंके यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न करत दिव्यांग बांधवाच्या हस्ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निलेश लंकेच्या साधेपणा चांगलाच चर्चेत आला होता. 


निलेश लंकेच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुंडे, राजू राजळेंचे फोटो


आता आज निलेश लंकेश यांच्या प्रचारार्थ शेवगावमध्ये (Shevgaon) शरद पवारांची (Sharad Pawar) जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) देखील उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि राजू राजळे (Raju Rajale) यांचे फोटो टाकल्याने वाद निर्माण झाला आहे.


भाजपची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार


गोपीनाथ मुंडे आणि राजू राजळे यांचे फोटो पोस्टरवर झळकल्याने भाजपने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर (Vishnupant Akolkar) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. भाजप नेत्यांचे फोटो वापरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा मविआकडून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मविआच्या बॅनरवर भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे आणि भाजपच्या शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांचे पती स्व. राजीव राजळे यांच्या फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार, म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...


'इंग्रजी बोलतो म्हणजे खूप शहाणा झालो असं नाही, तुमचं इंग्रजी तुम्हालाच लखलाभ असो', सुजय विखेंच्या आव्हानावर शरद पवारांची बोचरी टीका