Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नेवासा (Newasa) तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. घोगरगाव येथे राजरोसपणे कारवाई सुरु असताना महसुल प्रशासन डोळेझाक करत आहेत. यामुळं आमदार शंकरराव गडाख (MLA Shankarao Gadakh) यांनी स्वतः तहसीलदार व पोलिसांना सोबत नेवून नदीपात्रात सुरु असलेलं अवैध वाळूउपशाचे ठिकाण दाखवून चांगलंच फैलावर घेतलं.


कडक कारवाई करण्याच्या सुचना 


नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे गोदावरी नदीपात्रातून राजरोसपणे वाळू तस्करी सुरु आहे. वाळू तस्करीला विरोध करणाऱ्यांना अनेकदा वाळू तस्करांकडून मारहाणीच्या घटना देखील घडल्या आहेत. गोदावरी नदीपात्रातून सुरु असलेल्या वाळू उपशाचे ठिकाण तहसीलदारांना दाखवत कडक कारवाई करण्याच्या सुचना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिल्या आहेत. 


यशवंतराव गडाख महाविकास आघाडी सरकारमध्ये मृदा व जलसंधारण मंत्री होते


शंकरराव यशवंतराव गडाख हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते सध्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण या विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. तसेच धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर ते नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी  उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. 


अनेक ठिकाणी वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ले


दरम्यान, अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गावातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी त्यांची स्वतःची यंत्रणाही तयार केली असून ही यंत्रणाच आता महसूलच्या जीवावर उठली आहे. या लढाईत महसूल यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. राज्यातील शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी लहान मोठ्या नद्यांच्या पात्रातून अमर्यादपणे वाळूचा उपसा होत आहे. पूर्वी गावातील छोट्या मोठ्या बांधकामांपर्यंत मर्यादीत असणारी वाळूची मागणी प्रचंड वाढली आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रांनी शिरकाव केला आहे. जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोटी अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू उपसून शहरांकडे पाठवली जात आहे.


महत्वाच्या बातम्या:


Yavatmal Crime News : वाळू तस्करांची शिरजोरी सुरूच! दिवसाढवळ्या भर रस्त्यात चक्क तलाठ्यासह कोतवालला मारहाण