एक्स्प्लोर

देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू

मला तुमची पद्धत आवडली, लोकशाही पद्धतीने आपले म्हणणे मांडून, तुम्ही शांतपणे बसलात. मी तुमचे अभिनंदन करतो.

अहिल्यानगर : राहुरीत अक्षय कर्डीले (Akshay kardile) यांच्यासाठी आयोजित सभेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही परीक्षार्थी उमेदवारांनी बॅनर दाखवले असून देवाभाऊ न्याय द्या, अशा आशयाचे बॅनर झळकवल्याने राहुरीतील सभेत याचीच चर्चा रंगली. स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांनी हे बॅनर दाखवले असून भरती रखडल्याने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर, तुमचे प्रश्न समजून घेऊन, मार्ग काढू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. दरम्यान, तत्पूर्वी सभेत माजी खासदार सुजय विखे यांनीही तुमच्या प्रश्नासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वेळ देतील असे म्हटले होते. 

मला तुमची पद्धत आवडली, लोकशाही पद्धतीने आपले म्हणणे मांडून, तुम्ही शांतपणे बसलात. मी तुमचे अभिनंदन करतो. तुमचे प्रश्न समजून घेऊन, मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया भाषणादरम्यान मुख्यमंत्र्‍यांनी आंदोलकांना उद्देशून दिली. तसेच, शिवाजीराव कर्डीले यांच्या आठवणी जागवत अक्षयला विधानसभेत पाठवण्याची विनंती राहुरीकरांना केली. 

ही पोट निवडणूक आली नसती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता, शिवाजीराव कर्डीले यांच्याबाबत आपल्या प्रत्येकाजवळ काही न काही आठवणी आहेत. शिवाजीराव कर्डीले यांच्या ठायी जनतेचा विषय असायचा, शिवाजीराव हे अतिशय धोरणी राजकारणी होते. कोणाला नेता करायचं, आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना ठाऊक होते. कर्डीले साहेबांनी मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यावरही आराम केला नाही. जनतेची सेवा करत करत त्यांनी शरीराचा ऱ्हास करून घेतला. या अडचणीच्या काळातही ते डगमगले नाही, त्यांचे जाण्याचे वय नव्हते, पुढे मोठे राजकीय कारकीर्द होती. ते भेटले की नेहमी ते निळवंडे प्रश्न आणि, वांबोरी चारीबाबत बोलायचे. आता, वांबोरी चारीसाठी 125 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशा आठवणी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितले.

समुद्रात वाहून जाणार 75 टीएमसी पाणी मराठवाडा आणि पश्चिम भागात आणण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. सर्वच धरणातील गाळ काढून पाणी साठा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाजीराव कर्डीले यांच्यापेक्षा दीडपट जास्त प्रेम अक्षयवर आम्ही करू, आमच्याकडून एखादं काम शिवाजीराव कर्डीले यांचे करायचे राहिले असेल पण अक्षयची सर्व कामे आम्ही पूर्ण करू हे सांगायला आम्ही आलोय, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राहुरीकरांना अक्षयच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

संग्राम जगताप, सुजय विखे यांनी या निवडणुकीची धुरा अतिशय चांगल्या प्रकारे हातात घेतली आहे. या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत हे शिवाजीराव कर्डीले यांना दिलेली श्रद्धांजली असेल. कृषी विद्यापीठातील अधिकचीजी जागा आहे, त्यातील एक हजार एकर जागा आपल्याला एमआयडीसीसाठी देता येईल. राहुरी एमआयडीसीचे पुर्नजीवन करायचे आहे, अक्षय कर्डिलेला मी राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देऊन जात आहे, असे म्हणत राहुरीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिले.

प्राजक्त तनपुरेंचेही मानले आभार

मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला, त्यांनी माझं ऐकलं त्याबद्दल त्यांचे आभार. आपल्याला सातत्याने लोक हिताचे काम करायचे आहे ते केले जातील. खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी कर्जमाफी अस्तित्वात आणणार आहोत, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना भविष्यातही मोफत वीज दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही, असेही फडणवीसांनी म्हटले.

अक्षय कर्डीले भावूक, बहिणीच्या डोळ्यातही अश्रू

राहुर पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना वडिलांच्या आठवणीने अक्षय कर्डिले भावूक झाल्याचं दिसून आलं, तर अक्षय यांच्या भाषणावेळी त्यांच्या पत्नी आणि बहिणीच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. मतदारसंघातील सर्व लोक माझ्यामागे भक्कमपणे उभे आहेत. माझं दुर्भाग्य आहे की, माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत असताना माझे वडील माझ्यासोबत नाहीत, असे म्हणताना अक्षय कर्डिले भावूक झाले होते.

हेही वाचा

साताऱ्याचं जनमत, लोकमत आणि मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता, शंभूराज देसाई एकनाथ शिंदेंसमोर काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget