एक्स्प्लोर

धक्कादायक! 'स्मशानातील सोन्या'च्या हव्यासापोटी अस्थींचीही चोरी

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे स्मशानभूमीतून चक्क राख चोरीला जातेय... अंत्यविधीनंतर उरणारी राख अगदी अस्थीसह गायब होत असल्यानं ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

Ahmednagar latest News : अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे स्मशानभूमीतून चक्क राख चोरीला जातेय... अंत्यविधीनंतर उरणारी राख अगदी अस्थीसह गायब होत असल्यानं ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. करंजी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.    

 पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर गावातील उत्तरेश्वराच्या मंदिराजवळ असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी होतो. मात्र, अत्यंविधी झाल्यानंतर  दुसऱ्या दिवशी मृत व्यक्तीचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी गेल्यानंतर राखेसह अस्थी चोरल्या जात आहेत. आतापर्यंत चार वेळा असे प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील सोमवारी करंजी गावातील लिलाबाई वामन यांचे  दुःखत निधन झाले. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. मात्र दुसऱ्या दिवशी जेंव्हा त्यांचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तर त्यांच्या अस्थी गायब होत्या असं त्यांचा मुलगा रमेश वामन यांनी सांगितले.विशेष म्हणजे केवळ महिलांची राख चोरीला जात असल्याने मृत व्यक्तींच्या अंगावरील सोन्याच्या हव्यासापोटी हे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. 

अंत्यविधीवेळी लिलाबाई यांच्या अंगावर सुमारे पाऊने दोन तोळे सोने होते. लिलाबाई यांना नथ घालण्याची हौश होती. अत्यंविधीच्यावेळी मुलांनी नवी नथ आईला घातली होती. या सोन्यासाठी चोराने थेट राखेसह अस्थी देखील चोरून घेऊन गेला. मृत व्यक्तीच्या अंगावरील डाग दागिने गेले याचे दुःख वाटत नाही मात्र,राखेसह थेट अस्थीच चोरून नेल्या जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मृत व्यक्तींच्या अस्थी या दशक्रिया विधीसाठी लागत असतात मात्र सोन्यासाठी थेट अस्थीच चोरल्या जात असल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे गावातील सुभाष अकोलकर यांनी म्हटले आहे.

लिलाबाई यांच्या आधीही करंजी गावात असे प्रकार तीन वेळा झाले आहेत. विशेष याआधी कोरोनामुळे निधन झालेल्या महिलेची राख चोरट्यांनी चोरून नेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान वारंवार अशा घटना घडत असल्याने ग्रामपंचायतमध्ये यावर चर्चा करून स्मशानभूमीत सीसीटीव्ही बसवणार असल्याचे गावचे उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. अशा स्मशानभूमीतून राख चोरीला जात असल्याने पोलिसांकडे तरी तक्रार कशी करावी असा प्रश्न ग्रामस्थांपुढे पडला आहे.

उत्तरेश्वराच्या मंदिर परिसरात सध्या सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र, चोरटे स्मशानभूमीच्या मागच्या गेटने आत येतात.बाजूलाच नदी असल्याने तिथून पाणी घेऊन अंत्यविधीची राख विझवतात आणि राख अस्थींसह भरून घेऊन जातात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.आता मृत व्यक्तीच्या अस्थींच्या सुरक्षेसाठी रखवालदार किंवा सीसीटीव्ही लावण्याची वेळ येणार असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, पाशा पटेल यांच्याकडून इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या निर्णयाचं जोरदार समर्थन
E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, पाशा पटेल E20 च्या समर्थनासाठी मैदानात
Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
Embed widget