Balasaheb Thorat on Ajit pawar : निलेश लंके (Nilesh Lanke) सारख्याला दमबाजी करून काय उपयोग आहे. अजित पवारांना धाडस दाखविण्याची खूप संधी होती.  त्यावेळी ते दाखवलं नाही, असा खोचक टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे.


महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है, माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) नगरचे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना इशारा दिला होता. यावरून बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. 


लंकेंना दमबाजी करून काय उपयोग? 


बाळासाहेब थोरात म्हणाले की, अजित पवार सगळ्या अर्थानं तगडी असामी आहेत. निलेश लंके सारख्याला दमबाजी करून काय उपयोग आहे. त्यांना धाडस दाखविण्याची खूप संधी होती.  त्यावेळी ते दाखवलं नाही. लोकांनी उचललेल्या उमेदवाराला दमबाजी करून काय उपयोग, असा टोला त्यांनी यावेळी अजित पवारांना लगावला. 


मोदी यशस्वी होणार नाहीत


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नंदुरबार येथील सभेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, अशी ऑफर दिली. याबाबत बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीला पराभव दिसत असल्याने जुळवाजुळव करण्याची वेळ आली तर काय करावं हा त्यांचा अभ्यास सुरू आहे. कधी ठाकरे तर कधी पवारांना जवळ करण्याचा प्रयत्न ते करताय. मात्र हे यशस्वी होणार नाही, असे त्यांनी म्हटले. 


भाजपवरील नाराजीचा मविआला फायदा होणार


नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महविकास आघाडी विजयी होणार आहे. भाजपवरील नाराजीचा महाविकास आघाडीला फायदा होईल. मोदींकडून भाषणात दिशाभूल करणारी वक्तव्य केली जात आहे. धर्मावर आधारित मुद्दे ते सांगताय. राज्यात सुद्धा आमचा आकडा चांगला राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमच्या अंदाजापेक्षा जास्त यश आम्हाला मिळेल. घटणाऱ्या मतदान टक्केवारीचा परिणाम भाजपवर होईल. राज्यातील राजकारणामुळे जनता नाराज आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Nilesh Lanke on Ajit Pawar : अजितदादा म्हणाले, तुझा कंड जिरवणार, आता निलेश लंकेंचं जोरदार उत्तर!