Amol Kolhe on Ajit Pawar, अहमदनगर : "शिरुर लोकसभेची जागा महायुतीतील कोणता पक्ष लढवणार हेच अजून निश्चित झालेलं नाही. कारण भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाने देखील या जागेवर दावा केलाय. भोसरीचे विलास लांडे देखील इच्छुक आहेत. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सध्या अनेकांची अशी अवस्था आहे की, दिल्लीतून गुबू गुबू वाजलं की नंदीबैला सारखं मान डोलावायची" असा टोला खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते. 


 निवडणूक केवळ कोल्हेची नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे


अमोल कोल्हे म्हणाले, अमित शहा जो निर्णय देतील तोच यांना मान्य करावा लागणार आहे. त्यामुळे आत्ता त्यांचा प्रवेश होईल याबाबत मलाच शासंकता आहे. मात्र, शरद पवार यांच्या विचाराने आणि आशीर्वादाने माझी तयारी सुरू आहे, ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. अढळराव पाटीलांची धावपळ मी पाहिली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे नक्कीच इच्छुक आहेत, असं कोल्हेंनी स्पष्ट केलं


राजीनाम्याबाबत काय म्हणाले कोल्हे?


पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, आपल्या नेत्याकडे एखादी गोष्ट बोलणं वेगळं आणि दुसरीकडे काम करणे वेगळं आहे. मी जरी राजीनामाचा विषय काढला असला तरी कामात कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. म्हणूनच मला तीन वेळेला संसदरत्न पुरस्कार मिळाला. अनेक कामांमध्ये मी पाठपुरावा केला आणि ते काम केले. त्यामुळे मी एखादी गोष्ट बोललो त्याचाच भांडवल न करता कामाचा देखील मूल्यमापन व्हायला हवं असं अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. अजित पवारांची राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू होती त्यावेळेला शिवस्वराज्य यात्रा जयंत पाटील यांच्यासोबत पूर्ण करणारा खासदार अमोल कोल्हे नव्हता का? विधानसभेचा प्रचार करत असताना डॉ. अमोल कोल्हे फक्त सेलिब्रिटी आहे, अशी भावना दादांची होती का? असे सवाल अमोल कोल्हे यांनी यावेळी अजित पवारांना केले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Amol Kolhe Reply to Ajit Pawar : डॉक्टर, वकील खासदार होऊ शकतात, मग हा कलावंत यांच्या घशात का अडकतो? 'लक्ष्या'च्या डायलॉगमध्ये अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर