अकोले : भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) पोहण्यासाठी गेलेल्या एका 26 वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू (Drown) झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. सद्दाम शेख,(26, रा. पूनमनगर, शिर्डी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक (Tourists) गर्दी करत असतात. आज शिर्डी (Shirdi) परिसरातील सहा तरुण भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. त्यातील काही जण भंडारदरा धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यातील सद्दाम शेख हा तरुण पाण्यात बुडाला. 


मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश 


याबाबत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मयत सद्दामचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या तरुणांपैकी काहींचा पाण्यात धिंगाणा घालतानांचा व्हिडिओ समोर आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मुंबईतील रिझवी कॉलेजचे चार विद्यार्थी बुडाले, खालापूरच्या धरणातील सहलीवेळी घडली दुर्घटना


रशियात बुडून जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, कुटुंबाच्या आक्रोशाने मन सुन्न!