अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे सध्या मनात नाही, मात्र चर्चा बऱ्याच होतात. हे दुसऱ्या पक्षात जाणार आहे, मात्र या सर्व निरर्थक चर्चा असून आम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि पक्ष बळकट करण्याचे काम सुरू असल्याचा विवेक कोल्हे यांनी म्हटल आहे. तसेच भाजपच्या माजी आमदार यांचा पराभव विखेंमुळे झाल्याचा पुन्हा एकदा विवेक कोल्हे यांनी पुनर्विचार केला आहे.
आता हळूहळू आगामी निवडणुकांच्या (Loksabha elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी चंग बांधला असून एकेक पत्ते बाहेर पडू लागले आहेत. सर्वच निवडणुकांकडे लक्ष लागले असून निवडणुका केव्हा जाहीर होतील, आणि कधी सगळी धावपळ सुरु होईल, अशी घालमेल सध्या नेत्यांमध्ये दिसून येत आहे. यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली असून कुणाविरुद्ध कोण लढणार याचे आडाखे देखील बांधले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे (Vivek Kolhe) राधाकृष्ण विखें पाटलांच्या मतदारसंघात विखेंच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र विवेक कोल्हे यांनी या केवळ चर्चा असल्याचे म्हटल आहे.
राधाकृष्ण विखे पितापुत्रांच्या विरोधात गणेश सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विवेक कोल्हे विखे यांच्या मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याचे बोलल जातं आहे. तर आम्ही निवडणूक लढवलेल्या ग्रामपंचायती या विखेंच्या ताब्यात होत्या, मात्र लोकांना परिवर्तन हवं होतं, तसेच ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार देखील झाला होता, पाणीपुरवठा योजना देखील नव्हती. त्यामुळे राहता तालुक्यातील ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्याचं विवेक कोल्हे यांनी म्हटल आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, विखे यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे सध्या मनात नाही, मात्र चर्चा बऱ्याच होतात. हे दुसऱ्या पक्षात जाणार आहे, मात्र या सर्व निरर्थक चर्चा असून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि पक्ष बळकट करण्याचे काम सुरू असल्याचा विवेक कोल्हे यांनी म्हटल आहे. तसेच भाजपच्या माजी आमदार यांचा पराभव विखेंमुळे झाल्याचा पुन्हा एकदा विवेक कोल्हे यांनी पुनर्विचार केला आहे. विधानसभा निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मेव्हणे उभे राहिल्याने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्याच त्यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाची बातमी :