एक्स्प्लोर

बैलगाडीतून वऱ्हाडी अन् टाळ मृदंगाचा गजर, अहमदनगरमधील अनोख्या लग्नाची चर्चा

Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे आज एक अनोखा विवाहसोहळा पार पडला.

Ahmednagar latest News Update : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव येथे आज एक अनोखा विवाहसोहळा पार पडला.  येथील गाडेकर आणि भवार कुटुंबातील देवेंद्र भवार आणि पल्लवी गाडेकर यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने चक्क वीस बैलगाडीतून वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी दाखल झाले. त्याशिवाय नवरदेव आणि नवरीने देखील पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. या विवाह सोहळ्याची सध्या परिसरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

शिंगवे केशव येथील प्रल्हाद भवार यांचे चिरंजीव देवेंद्र भवार आणि याच गावातील हभप गंगाधर महाराज गाडेकर यांची कन्या पल्लवी गाडेकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न सोहळ्यादरम्यान वाहनांमधून तसेच फटक्यांच्या आतिषबाजीतून होणारे प्रदूषण आणि डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळत पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. लग्नाचे वऱ्हाडी बैलगाडीतून आले. यासाठी  20 बैलगाड्या सुंदर पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. एका मागून येणाऱ्या बैलगाड्या त्यात बसलेले वऱ्हाडी, सर्वात पुढे नवरदेव देवेंद्रही बैलगाडीतच अशी ही वऱ्हाडी मंडळी गावातील श्री क्षेत्र दत्त मंदिराकडे निघाली. विशेष म्हणजे वऱ्हाडीचे स्वागत करण्यासाठी टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला. तर महिला आणि वारकरी मुलांनी फुगडी खेळत वाजत- गाजत वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी दाखल झाले.

नवरदेव देवेंद्र भवार याने संत तुकाराम महाराजांप्रमाणे वेशभूषा परिधान केली होती तर नवरी मुलगी पल्लवी हिने राजमाता जिजाऊ यांच्या प्रमाणे वेशभूषा केली होती. देवेंद्रच्या हातात विना तर पल्लवीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते.हा विवाह सोहळा जुन्या काळातील विवाह सोहळ्याची आठवण करून देणारा होता. आपण वारकरी संप्रदायातील असल्याने अशा अनोख्या पद्धतीने विवाह होत असल्याने आनंद होत असल्याचे नवरदेव देवेंद्र भवार याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तर डीजेमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखत अतिशय अनोख्या पद्धतीने आपल्या मुलीचा विवाह सोहळा व्हावा अशी आपली इच्छा असल्याने आपण हे नियोजन केल्याचे नवरी मुलगी पल्लवीचे वडील हभप गंगाधर महाराज गाडेकर यांनी सांगितले.

केवळ समाजप्रबोधन न करता आपण स्वतः आचरणात या सर्व गोष्टी आणायला हव्यात असं त्यांनी सांगितले. तर या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या विवाह सोहळ्याचे कौतुक केले. गाडेकर महाराज हे नेहमीच किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतातच मात्र त्यांनी स्वतः आपल्या मुलीचे असे पारंपरिक पद्धतीने लग्न लावून समाजापुढे एक आदर्श ठेवल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी म्हंटले आहे.सध्या या लग्नाची परिसरातच नाही तर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget