अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण (Nilvande Dam) तब्बल 53 वर्षांनंतर पूर्णत्वास गेले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते डाव्या कालव्याचे उदघाटन करण्यात आले. तसेच मोदी यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. या धरणाच्या माध्यमातून जवळपास अहमदनगर जिल्ह्यासह सिन्नर (Sinner) तालुक्यातील 182 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अहमदनगर दौऱ्यावर असून काही वेळापूर्वीच त्यांनी शिर्डीच्या (Shirdi Sai Mandir) साईमंदिरात जात दर्शनासह आरती केली. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते अकोले तालुक्यातील निळवंडे धरणात जलपूजन करण्यात आले. तसेच डाव्या कालव्याचे उदघाटन देखील करण्यात आले. यावेळी पीएम मोदी यांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून धरणाची पाहणी करत धरणाबाबत माहिती घेतली. याचबरोबर डाव्या कालव्यातून पाणी देखील सोडण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) यांच्या हस्ते 31 मे रोजी कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाव्या कालव्याचे लोकार्पण करण्यात आले. 


अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. हा प्रकल्प तब्बल 53 वर्षांनंतर पूर्णत्वास गेला असून आतापर्यंत एकूण 5700 कोटींचा खर्च केल्याचे सांगितले जाते. या धरणाच्या कालव्यांच्या माध्यमातून अकोलेसह, सिन्नरच्या काही भागातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. या धरणामुळे अहमदनगरच्या सहा दुष्काळ भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले आहे. 


असा आहे थोडक्यात इतिहास? 


साधारण 1970 च्या सुमारास या प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र सुरवातीच्या दोन गावांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प बारगळत राहिला. शेवटी 1993 मध्ये निळवंडे परिसरात धरण प्रकल्प कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली. त्यानुसार निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. डावा कालवा हा 85 किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमधील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर मधील सहा गावे असे एकूण 113 गावांमधील पाणी प्रश्न मिटणार आहे. तर उजवा कालवा हा 97 किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील 69 गावांमधील 20395 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


PM Modi Shirdi Visit LIVE : पंतप्रधान मोदी साईचरणी लीन; सोबत मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री