PM Modi Shirdi Visit LIVE : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi Shirdi Today LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मोदींनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं, यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Oct 2023 04:44 PM
शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री राहिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले.आम्ही त्याच कालावधीत साडे 13 लाख कोटी एमएसपीवर खर्च केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम केल असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. 

शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री राहिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले.आम्ही त्याच कालावधीत साडे 13 लाख कोटी एमएसपीवर खर्च केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम केल असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. 

PM Modi Visit Shirdi : हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

PM Modi Visit Shirdi : ज्येष्ठ किर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. देशातील अनमोल रत्न वारकरी संप्रदायाचे बाबा महाराज सातारकर यांच्या वैकुंठगमनाचे दुखद बातमी समजली. त्यांचे आदरपूर्वक बोलणे, वाणीची शैलीची त्याचा प्रभाव आम्ही पाहिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. 

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीजवळील काकडी गावात सभास्थळी दाखल, हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित 

PM Modi Visit Shirdi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर असून काही वेळापूर्वीच त्यांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणात जलपूजन केले. तसेच डाव्या कालव्याचे उदघाटन देखील करण्यात आले. यानंतर पीएम मोदी आता शिर्डी विमानतळाजवळील काकडी या गावी आले असून या ठिकाणी सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेत विविध कामाचे उदघाटन देखिल करण्यात येणार आहे. 


 

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून  स्वागत

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान मोदींनी शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेत पाद्यपूजन आणि आरती केली. त्यानंतर आता मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या उद्घाटनासाठी पोहचले आहेत. याठिकाणी सुरवातीला मोदी यांनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टर द्वारे पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यात आले. 

PM Modi Shirdi Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी पोहोचणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत.  मोदींचे भाषण ऐकण्यासाठी शिर्डी अहमदनगर आजूबाजूच्या गावातून हजारोच्या संख्येने लोक पोहोचली आहेत. कडेकोट बंदोबस्तात पोलीस प्रत्येकाला तपासूनच आत मध्ये सोडत आहेत. राज्यातील 14 हजार कोटी रुपयांची विविध प्रकल्पांचे, विकासकामांचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी साई मंदिरात पाद्यपूजा संपन्न, मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित 

PM Modi Visit Shirdi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून शिर्डी साईमंदिरात त्यांनी दर्शन घेतलं;. यावेळी पाद्यपूजेसह साईदर्शन घेत आरतीही संपन्न झाली. यावेळी पीएम मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस येऊ देखील मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते. 

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान मोदी शिर्डीत दाखल, थोड्याच वेळात साई चरणी नतमस्तक होणार

पंतप्रधान मोदी शिर्डीत दाखल, थोड्याच वेळात साईंची पाद्यपूजा आणि आरती, निळवंडे धरण डाव्या कालव्यासह अनेक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण 


PM Modi Visit Shirdi : पीएम नरेंद्र मोदीं शिर्डीत दाखल, थोड्याच वेळात साईबाबांचे दर्शनासह आरती होणार, मंदिर अर्धा तासांसाठी बंद 

PM Modi Visit Shirdi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar District Visit) आले असून नुकतंच ते शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीतील साई मंदिरात ते साईचरणी नतमस्तकही होतील. या सुमारास अर्धा तास हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. साई मंदिरात पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात येईल. त्याचबरोबर 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटेखानी आरतीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. 

PM Modi Visit Shirdi : पीएम नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी नेतेमंडळी हेलिपॅडकडे रवाना, मोदी थोड्याच वेळात शिर्डी दाखल 

PM Modi Visit Shirdi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar District Visit) येत आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी थोड्याच वेळात शिर्डी विमानतळावर पोहचत आहेत. मोदींच्या स्वागतासाठी सर्वच नेते हेलिपॅड्सकडे रवाना झाले असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित आहेत. 

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर, पंतप्रधानांच्या दर्शनावेळी मंदिर अर्धा तास बंद राहणार

PM Modi Visit Shirdi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar District Visit) येत आहेत. ते शिर्डीत साईचरणी नतमस्तकही होतील. या सुमारास अर्धा तास हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. साई मंदिरात पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात येईल. त्याचबरोबर 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटेखानी आरतीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. 

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीला रवाना, पीएम नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त उपस्थित राहणार 

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना नरेंद्र मोदी उपस्थिती दर्शविणारी आहेत. या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार असून असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे शिर्डीला रवाना झाले आहेत. तर दुपारी एक वाजेच्या सुमारास पीएम नरेंद्र मोदी शिर्डीत पोहचणार आहेत. 

PM Modi at Ahmednagar LIVE: कसा असेल पंतप्रधान मोदींचा अहमदनगर दौरा? 

PM Modi at Ahmednagar LIVE: कसा असेल पंतप्रधान मोदींचा अहमदनगर दौरा? 



  • पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होणार 

  • त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा करतील 

  • पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार

  • यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल

  • पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील

  • सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश 

  • या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील

PM Narendra Modi at Shirdi Visit: आयुष हॉस्पिटलचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

PM Narendra Modi at Shirdi visit today LIVE Updates : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच शुभारंभ होणार आहे. अहमदनगरच्या आयुष रुग्णालयाचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. 

PM Modi at Ahmednagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, आज तिसऱ्यांदा ते साईचरणी नतमस्तक होणार

PM Modi at Ahmednagar : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar District Visit) येत आहेत. जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात नरेंद्र मोदी साईबाबांच्या समाधीच दर्शन (Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi) घेऊन करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. 

PM Modi shirdi Visit LIVE Updates: पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती

PM Modi shirdi Visit LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीतील साईमंदिरात दर्शनासाठी येणार आहे. दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी साईमंदिरात दर्शन घेतील. मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती होईल. साईबाबा संस्थानच्या वतीने पंतप्रधानांचा सत्कार केला जाईल. मात्र पंतप्रधान मंदिरात असताना अर्ध्यातासाठी दर्शन रांग बंद राहणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. 2018 मध्ये साई समाधी शताब्दी सोहळ्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते, त्यानंतर पाच वर्षांनी पंतप्रधान मोदी साई समाधीचे दर्शन घेतील.

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या गाड्या पाठवल्या परत

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या गाड्या पाठवल्या परत


शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील घटना


मराठा आरक्षणासंदर्भात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक


या गावात पुढाऱ्यांना येण्यासाठी घातली आहे बंदी


विखे कुटुंबीय विरोधात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक

पार्श्वभूमी

PM Narendra Modi at Shirdi visit today LIVE Updates: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Shirdi visit) आज (26 ऑक्टोबर 2023) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे. 


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात नरेंद्र मोदी साईबाबांच्या समाधीच दर्शन घेऊन करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.  2018 मध्ये साईबाबांच्या समाधीचं शताब्दी वर्ष होतं. या सोहळ्याची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातावरणकुलीत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.


कसा असेल मोदींचा अहमदनगर जिल्ह्याचा दौरा?



  • पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होणार 

  • त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा करतील 

  • पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार

  • यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल

  • पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील

  • सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश 

  • या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.