अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) येथील धनगर आरक्षण आंदोलनाचा (Dhangar Aarkshan) आज 21 वा दिवस असून उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर या दोघांचीही प्रकृती बिघडली आहे. यासाठी 15 जणांची विशेष वैद्यकीय टीम पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा (CM Eknath Shinde) फोन येऊन गेला. यावेळी 'ठोस आश्वासन नाही, कोणत्या आधारावर उपोषण सोडायचं, असा सवाल आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. तर आज गिरीश मंत्री आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा करणार आहेत.
धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडीत सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषण आंदोलनाचा आजचा 21वा दिवस आहे, दरम्यान उपोषणकर्ते सुरेश बंडगर (Suresh Bandgar) आणि अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे 15 जणांची विशेष वैद्यकीय टीम पाठवणार असल्याचे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांशी फोनवरुन चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. दरम्यान आज मंत्री गिरीश महाजन हे चौंडीत उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाची पुढची दिशा काय ठरते हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
चौंडी येथील उपोषणकर्त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करुन उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे, अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली आहे. सोबतच सरकारच्या वतीने आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) चौंडीत आंदोलकांशी चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंकडून देण्यात आल्याचेही दोडतले यांनी सांगितलं. सरकार धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक असून उपोषण सोडावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन दिलं आहे. मात्र, उद्या मार्ग निघाला नाही आणि ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही उपोषणावर ठाम आहोत, असंही दोडतले यांनी म्हटलं आहे. 'आम्ही आश्वासनावर उपोषण सोडणार नाही, ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सुरुच ठेवू' असा निर्धार दोडतले यांनी व्यक्त केला आहे.
मंत्री गिरीश महाजन आज चौंडीत
'सरकार आपल्या मागणीबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे उपोषण मागे घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. त्यानंतर उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, "धनगर आरक्षणाबाबत कोणतेही ठोस आश्वासन नाही, अगोदर ठोस आश्वासन द्यावे. नाहीतर आम्ही कोणत्या आधारावर उपोषण सोडायचे. त्यामुळे आमचे उपोषण चालूच राहिल. राज्यात चक्काजामचा निर्णय घेतला जाईल." राज्यभरातून धनगर समाज बांधव चौंडीतील उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा देत आहेत. आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपोषणस्थळी सोमवारी पुन्हा भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. सरकारतर्फे जबाबदारी असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर चर्चा करुन उपोषणस्थळी भेट देण्याची विनंती केली. त्यानुसार महाजन आज मंगळवारी चौंडी येथील उपोषणकर्त्यांशी बोलणी करतील, असे सांगण्यात आले.
इतर महत्वाची बातमी :