अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवती अमावस्येनिमित्त (Somvati Amavasya) भजन सुरू असताना अचानक दोन गटात तुंबळ हाणामारीची (Clash) घटना घडली आहे. भजन म्हणणाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून संबंधित घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Video Viral) झाला आहे. घटनेनंतर तालुक्यातील गुहा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


आज सोमवती अमावस्येनिमित्त राहुरी तालुक्यातील गुहा गावातील कानिफनाथ मंदिरात (Kanifnath Mandir) भजनाचे आयोजन करण्यात आले होते. हे भजन सुरू असताना अचानक दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यावसान थेट हाणामारीत झाल्याने परिसरात प्रचंड गोंधळ झाला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण  समोर आले. यात भजन भजन म्हणणाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. मात्र या प्रकाराने खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण आहे. 


अनेक वर्षांपासून राहुरी (Rahuri taluka) तालुक्यातील गुहा गावात कानिफनाथ महारांजाच्या मंदिरात आरती केली जाते. आज सोमवती अमावस्येनिमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन गट समोरासमोर आल्यानंतर काही कारणावरून वादाला सुरवात झाली. या वादाचे रूपांतर काही वेळात हाणामारीत झाले. जवळपास वीस ते तीस लोकांचा जमाव एकमेकांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जमाव दाखल झाला आहे. आता पोलीस पुढची भूमिका काय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. 


इतर महत्वाची बातमी :