अहमदनगर : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्याकडून पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आमदार रोहित पवारांचे समर्थक प्रशांत शिंदे (Prashnat Shinde) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत (Grampanchayat) विजय मिळवलेल्या जवळा ग्रामपंचायतच्या सरपंचासह सदस्यांनी आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे दोन सरपंच निवडून आले होते. 


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक निवडणुका देखील नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी (Grampanchayat Election) सर्वच नेते लक्ष ठेवून असतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत रोहित पवार यांना चांगलाच धक्का बसला. पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात (Karjat) भाजपने प्रवेश केला. त्यानंतर आता जवळा येथील ग्रामपंचायत सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी जाऊन भाजपमध्ये सहभागी झाल्याचं जाहीर केलं आहे. ग्रामपंचायत सोबतच रोहित पवार यांचे खंदे समर्थक असलेले प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदार रोहित पवारांना हा मोठा धक्का मनाला जात आहे.
 
विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळी जवळा ग्रामपंचातवर आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे दोघेही अप्रत्यक्षपणे दावा करत होते. अखेर यावेळी युवा नेते प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी भव्य सत्कार चोंडी येथे संपन्न झाला.


स्थानिक आघाडी म्हणून लढवली जवळा ग्रामपंचायत


जवळा ग्रामपंचायत (Javala Grampanchayat) निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही पक्षाचं लेबल लावलं नव्हतं, निवडणूक पुर्ण ताकदीने लढवली आणि जिंकली. आता गावाचा विकास करायचा असेल आणि गावाला वेगळेपण द्यायचं असेल तर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. शिंदे नेहमी काम करताना मोकळीक देतात. यामुळे पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी एकमुखी निर्णय घेत आमदार प्रा.राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज ग्रामपंचायत पदाधिकारी व शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला अशी प्रतिक्रिया प्रशांत शिंदे यांनी दिली. 


आ. राम शिंदे यांची प्रतिक्रिया


यावर आमदार राम शिंदे म्हणाले की, जवळा गावाच्या विकासासाठी आजवर भरघोस निधी दिला आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाच्या संदर्भात कुठलीही अडचण येऊ देणार नाही. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रशांत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे.  त्या सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत. पक्षात आलेल्या सर्वांचा मानसन्मान राखला जाईल. तुमच्या स्वागतालाच 25 लाख रूपयांचा निधी देऊन तुमचा सन्मान केला आहे. जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व नेते कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन व सर्वांचे पक्षात मनापासून स्वागत आमदार राम शिंदे यांनी केले. 


इतर महत्वाची बातमी : 


Beed : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पेटवलेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागरांचा मोठा निर्णय