अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या राहुरी तालुक्यात अॅड.राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅड. सौ. मनिषा आढाव यांटी निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून जिल्हा न्यायालयातील वकिलांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
या हत्येचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, तसेच वकिलांवर होणारे हल्ले आणि खोट्या केसेस याबाबत वकील प्रोटेक्शन अॅक्ट करावा अशी मागणी देखील अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नरेश गुगळे यांनी केली आहे. अनेक प्रकणांमध्ये वकिलांवर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. त्यामुळे आता वकिलांकडून त्यांच्या सुरक्षेची मागणी होत असल्याचं चित्र आहे.
तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने सोमवार 29 जानेवारी रोजी वकिलांनी काम बंद आंदोलन ठेवून या घटनेचा निषेध केला आहे. भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीने तीव्र आंदोले केली जातील असा इशाराही यावेळी वकील संघटनांनी दिलाय. अहमदनगरमधील जिल्ह न्यायालयातील बंदमध्ये अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशनचे तसेच कौटुंबिक न्यायालय, महसूल न्यायालय, औद्योगिक आणि कामगार न्यायालय, लवाद न्यायालय, ग्राहक मंच या सर्व न्यायालयांमधील वकिलांनी सहभाग घेतला होता.
नेमकं प्रकरण काय?
अहमदनगर येथील एका वकिल दाम्पत्याचे पाल लांखांच्या खंडणीसाठी आधी अपहरण करण्यात आले. त्यानंतर या दाम्पत्याचा खून करु मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या उंबरे येथे 25 जानेवारी रोजी धक्कादायक घटना घडली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत मुख्य आरोपी आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतलं. दरम्यान 5 लाखांची खंडणी न दिल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम जयवंत आढाव 52 वर्षे आणि मनीषा राजाराम आढाव वय 42 वर्षे असं या दाम्पत्याचं नाव होतं. नेहमीप्रमाणे ते 25 जानेवारी रोजी राहुरी येथून न्यायालयात गेले. पण त्या दिवशी दुपारनंतर त्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरु केला.