अहमदनगर: अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar- Chatrapati Sambhaji Nagar Accident) महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दुचाकींच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. अहमदनगरच्या (AhmedNagar Accident)  कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चारच्या अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल  येथे कंटेनरने धडक दिल्याने  हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मयतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. या घटनेने पारनेरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनिल बाळासाहेब पवार (वय 20), सोनाली अनिल पवार (वय22), माउली अनिल पवार आणि एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) अशी दुचाकीवरील मृतांची नावे आहेत.


अपघातानंतर कंटेनर चालक फरार


 इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक (एचआर 38, एसी 5848) ने पुढे चाललेल्या मोपेड दुचाकी क्रमांक (एमएच 16, सीबी 5202 ) तसेच दुसरी दुचाकी क्रमांक (एमएच 16, एव्ही 1931 यांना पाठीमागून जोराची धडक दिली. ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. त्यामध्ये मोपेड दुचाकीवरील चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल, ता. नगर) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला.


शेतकरी मजुराच्या कुटुंबावर काळाचा घाला


समोर आलेल्या माहितीनुसार, कांदा काढणीसाठी कापूरवाडीला वास्तव्य होते. वडगाव सावताळचे पवार कुटुंब हे कापूरवाडी (ता. नगर) येथे कांदा काढणीच्या कामासाठी एक ते दीड महिन्यापासून नगर तालुक्यात होते. मयत अनिल पवार यांची सासूरवाडी घोडेगाव (ता. नेवासा) येथील आहे. तयांच्या मागे आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. एकाच वेळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव सावताळ गावावर शोककळा पसरली आहे.


अहमदनगरमध्ये तिहेरी अपघात; सहा जणांचा मृत्यू


 24 जानेवारीच्या पाहाटे अडीच वाजताच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात घडली. ज्यामध्ये तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला.


हे ही वाचा :


Bhandara News : भंडाऱ्याच्या हिंदुस्तान कंपोझिट्स कंपनीत भीषण आग; कोट्यवधींचं साहित्य आगीत जळून खाक