एक्स्प्लोर

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व वादळाचा तीव्र तडाखा; लाखो रुपयांचे सोलर पंप उद्ध्वस्त, शेतकरी संकटात

Ahilyanagar Storm Damage : अनेक शेतकऱ्यांचे सोलर पॅनेल्स पूर्णपणे फुटले असून ते आता वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. लोखंडी अँगल आणि खांबांसह संपूर्ण सोलर यंत्रणा अनेक ठिकाणी मुळासकट उखडून पडली आहे.

अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने आणि तीव्र वादळी वाऱ्याने प्रचंड थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला असून, शेतातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोलर पंपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळाच्या तीव्रतेमुळे कोट्यवधी रुपयांचे सोलर पॅनेल्स तुटून आणि उन्मळून पडल्याने बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. 

1 जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळाचा जोर इतका तीव्र होता की, शेवगाव तालुक्यातील आव्हाने खुर्द, आव्हाने बुद्रुक, शहापूर, आणि बर्हाणपूर परिसराला याचा सर्वाधिक फटका बसला. या परिसरातील शेतांमध्ये बसवण्यात आलेले सोलर पॅनेल्स वाऱ्याच्या प्रचंड वेगाने थेट हवेत उडून गेले, तर अनेक ठिकाणी ते जमिनीवर कोसळून फुटले आहेत.

लाखो रुपयांचे नुकसान; शेतकरी भयंकर चिंतेत

पारंपरिक विजेला पर्याय म्हणून आणि दिवसा सिंचन करता यावे यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून तसेच स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी शेतात सोलर पंप बसवले होते. मात्र, या एकाच वादळाने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून टाकले आहे.

अनेक शेतकऱ्यांचे सोलर पॅनेल्स पूर्णपणे फुटले असून ते आता वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. लोखंडी अँगल आणि खांबांसह संपूर्ण सोलर यंत्रणा अनेक ठिकाणी मुळासकट उखडून पडली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आणि पेरणीच्या पूर्वतयारीच्या वेळीच सोलर पंप निकामी झाल्यामुळे आता पिकांना पाणी कसे द्यायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची मागणी

या अस्मानी संकटामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेवगावमधील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. महावितरण आणि प्रशासकीय यंत्रणेकडून आता तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महसूल विभाग आणि कृषी विभागाने तातडीने या वादळग्रस्त भागात संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत किंवा विमा नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी आर्त हाक शहापूर, आव्हाने आणि बह्रानपूर परिसरातील शेतकऱ्यांकडून प्रशासनाला दिली जात आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget