Ahmednagar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll) हे काही तासात समोर येणार आहेत. तर चार जूनला निकाल लागणार आहे.  या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मोठा दावा केला आहे. तब्बल दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार, असे त्यांनी म्हटले आहे. 


मला 100 टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे. 


निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला 


इतर उमेदवारांसारखे आपले आकडे कमी होत नाहीत, तर वाढतच आहेत. कारण सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे असं म्हणत निलेश लंके यांनी अप्रत्यक्षरीत्या त्यांनी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना टोला लगावलाय. निवडणूक झाल्याबरोबर आपण इतरांप्रमाणे आराम करण्यासाठी कुठे गेलो नसून जनतेसोबत असल्याचं म्हणत माझं दैनंदिन काम सध्या देखील सुरू असल्याचं त्यांनी म्हटल आहे.


विखेंकडून प्रशासनाचा गैरवापर : निलेश लंके 


काही दिवसांपूर्वी सुपा एमआयडीसी परिसरात जी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली ती सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे नाव न घेता त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचे निलेश लंके यांनी म्हटले आहे. मात्र गोरगरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून त्यांनी काय मिळवलं? विखेंकडून प्रशासनाचा कसा गैरवापर करण्यात आला. हे चार तारखेनंतर सर्वांसमोर सांगू,असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.


मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मंगळवार दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


पंतप्रधान मोदींमुळे सुजय विखे निवडून येणार पण, मताधिक्य मात्र...; भाजपच्या राम शिंदेंनी केला दावा


Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरला स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न, निलेश लंकेंच्या आरोपावर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले...