Maharashtra Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर विविध माध्यमांचे एक्झिट पोलचे आकडे जाहीर होत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी लढत होत असून आहे. टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Dr Sujay Vikhe) हे पिछाडीवर असल्याचे दिसून येते. मात्र हा एक्झिट पोल असून अंतिम निकाल हा चार जून रोजी जाहीर होणार आहे.
अहमदनगरमधून निलेश लंके आघाडीवर
TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर आहेत. डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहे. आता अहमदनगरमध्ये नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता
भाजपला महाराष्ट्रात सर्वाधिक 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष नंबर दोनचा पक्ष ठरणार आहे. ठाकरे गटाला महाराष्ट्रात 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 4 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या