एक्स्प्लोर

तानाजी सावंतांना उद्धव ठाकरेंकडून अभय? मातोश्रीवरील बैठकीत सावंतांविषयी चर्चाच नाही

दुसरीकडे सावंत यांना मंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही असलेले सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : बंडखोरी करणाऱ्या आमदार तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यासाठी मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र या बैठकीत सावंत यांच्याविषयी कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं बंडखोरी करणाऱ्या तानाजी सावंत यांच्या विरोधातला नाराजीचा सूर आज मातोश्री दरबारी पोहोचला. तानाजी सावंतांची हकालपट्टी करण्याची मागणी करत उस्मानाबाद आणि सोलापुरातले शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले होते. या बैठकीत कुठल्याही शिवसैनिकाने तानाजी सावंत यांच्याविषयी तक्रार केली नाही. फक्त संघटनात्मक चर्चा झाली. कुणीही त्यांच्या हकालपट्टीची मागणी देखील कुणी केली नाही, असे देखील विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची शिवसेनेत गय केली जात नाही, मात्र आजच्या बैठकीत तानाजी सावंत यांच्याविषयी कुठलीही चर्चा झाली नाही, असेही ते म्हणाले. दुसरीकडे सावंत यांना मंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही असलेले सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान त्यांच्या जागी सोलापूर जिल्हाच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्याने शिवसैनिकांनी आग्रही भूमिका घेतली होती. सोलापुरात लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी शिवसैनिकांची बैठक घेत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं आहे. सोबतच उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तानाजी सावंत गटाने भाजपला साथ दिली. सावंत यांची ही भूमिका पक्षाला चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. आज दुपारी सोलापूर आणि उस्मानाबाद येथील कार्यकर्त्यांची मातोश्री कार्यालयावर बैठक झाली. या बैठकीत सावंत यांच्याविरोधात काही कारवाई होते का याकडे लक्ष लागून होते. मात्र या बैठकीत सावंत यांच्याविषयी काहीच चर्चा झाली नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी बैठकीनंतर सांगितलं. शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढली आहे. तानाजी सावंतांनी घेतलेल्या शिवसेना विरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांचा तानाजी सावंतांवर रोष आहे. या बैठीकाला तानाजी सावंतांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमधील नाराजी आणखी वाढली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी केली जात होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तानाजी सावंत नाराज झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांचे खटके उडाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही तानाजी सावंत यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. याचा फटका याठिकाणी निवडणुकीत शिवसेनेला बसला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यातही त्यांनी दांडी मारली होती. एकूणच तानाजी सावंतांनी शिवसेनाविरोधी भूमिका घेतल्याने शिवसैनिक नाराज आहेत. तानाजी सावंतांविरोधात पोस्टरबाजी सोलापुरात काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करत टीका करण्यात आली. 'उद्धव साहेब हा खेकडा सोलापूर धाराशिवची (उस्मानाबाद) शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा' असं म्हणत निशाणा साधण्यात आला होता. मात्र हे पोस्टरबाजी कुणी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget