एक्स्प्लोर

पनामा पेपर्समध्ये अभिनेता अजय देवगनचंही नाव

मुंबई : पत्रकारितेच्या क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या पनामा पेपर्स लीकमध्ये आता बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगनचंही नाव आलं आहे. बच्चन कुटुंबीयांनंतर अजय देवगनचंही नाव पनामा प्रकरणात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.   एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या बातमीनुसार 2013 मध्ये अजय देवगनने ब्रिटीश वर्जिन आईसलँडमधील मेरिलबोन एन्टरटेनमेंट लिमिटेड कंपनीचे पूर्ण शेअर्स खरेदी केले होते. लंडनचे के हसन एन सयानी या कंपनीचे मूळ शेअर होल्डर आहेत. सयानी यांनी 31 ऑक्टोबर 2013 रोजी एक हजार समभाग जारी केले होते, तर अजयने त्याच दिवशी सगळे शेअर्स खरेदी केले.   दरम्यान, अजय देवगनने या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. परदेशात हिंदी चित्रपटांचे हक्क विकत घेण्यासाठी गुंतवणूक केल्याचा दावा अजयने केला आहे. माझ्या कुटुंबीयांनी याची पूर्ण नोंद टॅक्स रिटर्नमध्ये केली असल्याने सरकारला याबाबत माहिती असल्याचंही त्याने म्हटलं आहे.   अजय देवगनने या कंपनीतून राजीनामा दिला असून दोन परदेशी कंपन्यांचं नामांकन केलं आहे. आतापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांचीही नावं या प्रकरणात पुढे आली आहेत.   जगभरातल्या पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स या नावाने ब्लॅकमनी साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पत्रकारितेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जातो. पनामा पेपर्स या नावाने केलेला हा गौप्यस्फोट जगभरात चर्चेचा विषय आहे.     जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे.     पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.     पनामा पेपर्समध्ये भारतातील कोण कोण आहे?     भारतात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन,  डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलंय.     इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) आणि ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून हा गौप्यस्फोट झालाय. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचं सांगितलं जातं.     इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित केलेल्या बातमीत बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आलाय. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश आहे.     पनामा पेपर्स काय आहे?     पनामा पेपर्स ट्वीटरसह अन्य सोशल मीडियावर जगभरात टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये हाच विषय प्रामुख्याने चर्चिला जात आहे.     पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.     11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.     यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.    

संबंधित बातम्या :

पनामा पेपर्स लीक, ब्लॅकमनी साठवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

पनामा पेपर्समध्ये कोणा कोणाची नावं आहेत?

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
Horoscope Today : आज घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
आज घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget