Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असल्याचे चित्र आहे. अशातच या प्रकरणात आता मोठी अपडेट पुढे आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. काल (16 जानेवारी) रात्री मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर निकम यांनी भेट घेतली आहे.


या भेटी दरम्यान, मुख्यमंत्री आणि उज्ज्वल निकम यांच्यात 15-20  मिनिटं चर्चा झाल्याची माहिती ही पुढे आली आहे. मात्र, या भेटीसंदर्भातील तपशील सांगण्यास उज्ज्वल निकम यांनी नकार दिल्याने या भेटीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र बीड प्रकरणी वकीलपत्र घेण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी सरकारी वकील म्हणून निकम यांच्या नावाची घोषणेची दाट शक्यता आहे. 


आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून दखल? 


राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच सीआयडी देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आणि यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता आता त्याची न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येणार आहे. देशमुख यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली असून सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल. ताहलियानी ही एक सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. एम एल ताहलियानी यांनी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केल्याची माहिती आहे.


दुसरीकडे या प्रकरणावर सातत्याने भाष्य करणाऱ्या आमदार सुरेश धस (suresh dhas) आणि  देशमुख कुटुंबाने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबद्दल मागणी केली होती. या प्रकरणी निकम यांच्याकडे वकीलपत्र द्या, ही मागणी ही  यावेळी करण्यात आली होती. परिणामी या मागणीची दखल आता मुख्यमंत्र्याकडून घेतल्या जाण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या