Naseeruddin Shah On South Films : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असतात. अनेक घडामोडींवर ते आपलं मत व्यक्त करतात. नुकतंच नसीरूद्दीन शाह यांनी दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल आपलं मत मांडलं आहे. 'साऊथच्या चित्रपटांची कल्पना वेगळी असू शकते, पण त्यांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं' असं मत नसीरूद्दीन शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे. 


नसीरुद्दीन शाह यांनी साऊथ सिनेमांवर भाष्य केलं


इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी साऊथ सिनेमांबद्दल आपलं मत मांडलं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे की, 'दक्षिणात्य चित्रपट अर्थातच काल्पनिक असतात, तुम्हाला त्यांची कल्पना विचित्र वाटू शकते. पण हे चित्रपट मूळ आणि निःपक्षपाती असतात. यामुळेच ते इतर चित्रपटांपेक्षा वेगळे ठरतात आणि लोकांचं लक्ष वेधून घेतात. दाक्षिणात्य चित्रपटांच्या मागे हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त मेहनत घेतली जाते आणि त्याचा परिणाम चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्पष्टपणे दिसतो.' असं मत नसीरूद्दीन शाह यांनी फिल्म इंडस्ट्रीबद्दल मांडलं आहे. यापूर्वीही आपण पाहिलं आहे की, पुष्पा, KGF 2 आणि RRR यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. 


हिंदी चित्रपटसृष्टीवर नसीरुद्दीन शाह यांची संतप्त प्रतिक्रिया 


अलीकडेच जश्न-ए-रेख्तामध्ये नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ते म्हणाले की, 'हिंदी चित्रपटांमध्ये नेहमीच धर्मांची खिल्ली उडवली जाते. अनेक चित्रपटांमध्ये आपण पाहिलं आहे की, मुस्लिम व्यक्ती मित्राची भूमिका साकारते आणि चित्रपटाच्या शेवटी मरतो. तसेच, शीख आणि पारशी लोक हे नेहमीच विनोदाचे पात्र राहिले आहेत. हे आपण वर्षानुवर्ष पाहात आलो आहोत'. असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 


नसीरूद्दीन शाह यांच्या वर्क फ्रंटबद्दल 


नसीरूद्दीन शाह यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, येत्या 3 मार्चला 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड'  ही वेब सीरिज झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. या वेब सीरिजमध्ये नसिरुद्दीन शाह हे या सीरिजमध्ये अकबरची भूमिका साकारणार आहेत. तसेच, धर्मेंद्र, अदिती राव हैदरी आणि आशीम गुलाटी, ताहा शाह, शुभम कुमार मेहरा, राहुल बोस यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :