एक्स्प्लोर
भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद
![भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद Accident In Miraraod One Death भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/25081808/accident-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मिरा रोड: मुंबईत पुन्हा एकदा माणुसकीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिरा रोडमध्ये एका तरुणाच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण तब्बल 2 तास मदतीसाठी प्रतीक्षा करत होता. मात्र, येणाऱ्या जाणाऱ्या एकानंही त्याला रुग्णालयात नेलं नाही. दोन तासांनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा जीव वाचू शकला नाही.
18 जून रोजी झालेल्या या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य आज समोर आली आहेत. अशोक साहू असं अपघातामध्ये मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. अशोकच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दिरंगाईवर आरोप केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात बाईकस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काशिमिरा पोलीस आता जवळच्या सीसीटीव्हीच्या आधारे त्या बाईकस्वाराचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)