एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2020 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
![ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2020 | मंगळवार ABP Majha top ten headlines for 13th october 2020 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2020 | मंगळवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/14234051/top10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2020 | मंगळवार
- राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी तब्बल साडे बारा लाख सदोष RT-PCR किट्स वितरित झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे कबुली, सदोष किट्स पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार https://bit.ly/3lEBRxc
- मुंबईला PoK म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्राला आक्रमक उत्तर https://bit.ly/2Fsv4aw
- राज्यात दुसऱ्यांदा भाजपचं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन, राज्य सरकार बार सुरू करण्यासाठी परवानगी देतं मात्र मंदिरांना विरोध करतं यावरून भाजप नेत्यांचा हल्लाबोल https://bit.ly/3dpk8qt
- बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी आत्मचरित्राचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही ऑनलाईन उपस्थिती https://bit.ly/34QC6hX
- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरील पारंपरिक अधिकारासाठी पुन्हा बडवे समाज सर्वोच्च न्यायलायात, तब्बल सहा वर्षांनंतर क्युरेटिव्ह याचिका https://bit.ly/3jT8syY
- सलमान, शाहरुख, अजय देवगनसह बॉलिवूडमधील बडे निर्माते रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊ विरोधात दिल्ली हायकोर्टात https://bit.ly/34UCz2y
- कोरोनाच्या लढाईत प्रसुतीनंतर केवळ 14 दिवसात कर्तव्यावर हजर, बाळाला घेऊनच उत्तर प्रदेशातील IAS सौम्या पांडे यांचं काम सुरू! https://bit.ly/3lLmseF
- राज्यात 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुप्पट, तर देशात दररोज वाढणाऱ्या रुग्णांचा वेगही मंदावला! https://bit.ly/36ZAm8I
- चार दिवस पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र, मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात https://bit.ly/3nMVwN9
- iPhone 12 आज लॉन्च होणार! आयफोनच्या 5G स्पीडचे नवे मॉडेल्स आणि किंमतीबाबत उत्सुकता, भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होणार अॅपल इव्हेंट https://bit.ly/33Tg0Ms
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)