एक्स्प्लोर
LIVE : रेल्वेच्या कार्यक्रमात शिवसेनेची निदर्शने!
![LIVE : रेल्वेच्या कार्यक्रमात शिवसेनेची निदर्शने! Aaj Dinank Headlines On 07th June 2016 LIVE : रेल्वेच्या कार्यक्रमात शिवसेनेची निदर्शने!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/14072725/Aaj-Dinank-Headlines-News-2-580x39511-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हेडलाईन्स
BREAKING : मुंबईतील देवनार कचरा डेपोला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची हायकोर्टात धाव, आरक्षणावरील स्थगितीआधीचे प्रवेश आणि नियुक्त्या कायम करण्याची मागणी
डॉ. अभिनव देशमुख यांची गडचिरोलीला बदली, तर संदीप पाटील साताऱ्याचे नवे पोलीस अधिक्षक
सांगलीचे पोलीस अधिक्षक सुनील फुलारी यांची सिंधुदुर्गला बदली तर डी. टी. शिंदे हे सांगलीचे नवे पोलीस अधिक्षक
रेल्वेच्या कार्यक्रमात शिवसेना खासदारांचा काळे झेंडे दाखवून निषेध... खासदार असूनही वेळेत निमंत्रण पाठवलं जात नसल्याची खंत..
-----------
'उडता पंजाब' या चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने सुचविलेल्या कट्सच्या विरोधात निर्माते अनुराग कश्यप यांची उच्च न्यायालयात धाव, आजच सुनावणी
-------------
मोर्चा काढू नका, राजीनामा देऊ नका, गुरुदास कामत यांचं काँग्रेस नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना आवाहन
----------------
अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, मान्सून याच आठवड्यात महाराष्ट्रात, पुणे वेधशाळेचे अधिकृत घोषणा
----------------
मुंबई : गुरुदास कामत यांच्या समर्थनार्थ मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे 25 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत
----------------
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात भारताला बंपर बोनस, अमेरिका भारतात सहा अणुभट्टया उभारणार, NSG गटाचंही भारताला सदस्यत्व
----------------
2. स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सून केरळात दाखल, हवामान विभागासाठी मात्र मान्सून 48 तास दूरच, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण
----------------
3. वेळ देऊनही गुरुदास कामत सोनिया गांधींना भेटले नाहीत, माझाच्या सुत्रांची माहिती, पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली
----------------
4. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई, सीसीटीव्ही, स्पीड गव्हर्नरचा उपयोग, लवकरच कडक अंमलबाजावणी
----------------
5. एमईपीच्या टोलमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मोठं पाऊल, प्रायोगिक तत्वावर पाचही टोलनाक्यावर व्ही-टोल यंत्रणा, वसुली, वाहन संख्या रोज वेबसाईटवर
----------------
6. मेट्रो 3च्या मुद्द्यावरुन शिवसेनेची भाजपवर कुरघोडी, विरोधकांना हाताशी धरत महापालिकेच्या 17 जागा मेट्रोला देण्याचा प्रस्ताव फेटाळाला
----------------
7. मुंबईतील माटुंग्यात डेढिया इस्टेट या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू, फायर ब्रिगेडने ढिगारा हटवला, घटनेचा तपास सुरु
----------------
8. सेन्सॉर बोर्डाच्या मनमानीविरोधात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपला नेटीझन्सचा पाठिंबा, श्याम बेनेगल यांच्यासाठी 'उडता पंजाब'चं स्पेशन स्क्रीनिंग
----------------
9. महेंद्रसिंह धोनीची यंग ब्रिगेड मुंबई विमानतळावरुन झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने रंगणार
----------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
बातम्या
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)