एक्स्प्लोर

Nagpur Vaccination : 'या' केंद्रांवर मिळणार 18 वर्षावरील सर्वांना मोफत बुस्टर डोस

15 जुलैपासून 18 वर्षावरील सर्वांना ही लस मोफत दिली जाईल. या अभियानाचा देशातील 18 ते 59 या वयोगटातील लोकांना याचा फायदा मिळणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व केंद्रांवर देण्यात येणार आहे.

नागपूर :  केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या (State Government) निर्देशानुसार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशातील 18 वर्षावरील सर्व वयस्क नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची वर्धित मात्रा (बुस्टर डोज) 15 जुलै पासून मोफत देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षात केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. नागपूर महानगरपालिका तर्फे सुद्धा शुक्रवार पासून पात्र नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस (Booster dose) मोफत दिली जाईल. ही माहिती मनपा आयुक्त आणि प्रशासक (NMC Commisioner) राधाकृष्णन बी यांनी दिली. त्यांनी सांगितले कि कोरोनाची दुसरी लस घेतल्याच्या सहा महिन्यांनंतर कोरोनाची ही अतिरिक्त लस घेता येणार आहे. या आधी हा कालावधी नऊ महिन्याचा होता. तो कमी करत सरकारने सहा महिन्यांवर आणला आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे.
15 जुलैपासून शहरातील 18 वर्षावरील सर्वांना ही लस मोफत दिली जाईल. हे अभियान 15 जुलैपासून 30 सप्टेंबर पर्यंत (75 दिवस) चालणार आहे.  या अभियानाचा देशातील 18 ते 59 या वयोगटातील लोकांना याचा फायदा मिळणार आहे. नागपूर मनपा (NMC) आणि शासकीय केंद्रांवर लस मोफत दिली जाणार आहे. कोव्हीशिल्ड लस (Covishiled) सोमवार ते शनिवार सर्व केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच 12 ते 14 वर्ष वयोगातील मुलांना कर्बोव्हॅक्स लस शनिवारी दिली जाईल. कोव्हॅक्सीन लस सोमवार ते शुक्रवार 8 केंद्रांवर उपलब्ध राहील. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र मध्ये फक्त कोव्हॅक्सीन सोमवार ते शनिवार उपलब्ध राहील. 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची अतिरिक्त लस आधीपासूनच मोफत मिळत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य कर्मचारी आणि कोरोना आघाडीवरचे योध्दे यांनाही ही लस मोफत मिळत आहे.  

मनपाच्या या केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस सोमवार ते शनिवार उपलब्ध

झोन क्र. 1 लक्ष्मीनगर झोन
• कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर
• जयताळा यूपीएचसी, जयताळा
• खामला यूपीएचसी, खामला नागपूर 
झोन क्र. 2 धरमपेठ झोन
• फुटाळा यूपीएचसी,अमरावती रोड, गल्ली क्र. 3
• सदर रोग निदान केन्द्र, रेसिडेन्सी रोड, सदर 
• सुदाम नगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप
• के.टी. नगर यूपीएचसी, के.टी.नगर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• हजारी पहाड यूपीएचसी, हजारीपहाड
• डिक दवाखाना, व्हीआयपी रोड, धरमपेठ (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
झोन क्र. 3 हनुमाननगर झोन
• मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर
• नरसाळा यूपीएचसी, नरसाळा
• हुडकेश्वर यूपीएचसी, हुडकेश्वर
झोन क्र. 4 धंतोली झोन
• GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फक्त कोव्हॅक्सीन
• बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूल जवळ
• आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• एम्स हॉस्पीटल, मिहान, नागपूर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
झोन क्र. 5 नेहरूनगर झोन
• बिडीपेठ युपीएचसी, बिडीपेठ
• ताजबाग यूपीएचसी, बडा ताज बाग
• नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी
• दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर
झोन क्र. 6 गांधीबाग झोन
• महाल रोग निदान केंद्र, महाल (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)
• भालदारपुरा युपीएचसी, बजेरिया
• मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा
झोन क्र. 7 सतरंजीपुरा झोन
• मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग
• कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, मनपा शाळेजवळ
• जगनाथ बुधवारी युपीएचसी, गोळीबार चौक
• शांती नगर यूपीएचसी, शांती नगर
• सतरंजीपूरा यूपीएचसी
झोन क्र. 8 लकडगंज झोन
• डिप्टी सिग्नल युपीएचसी, संजय नगर, डिप्टी सिग्नल
• पारडी युपीएचसी, पारडी
• भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा
• हिवरी नगर युपीएचसी, हिवरी नगर
झोन क्र. 9 आशीनगर झोन
• पाचपावली युपीएचसी लष्करीबाग, आवळेबाबु चौक
• कपिल नगर यूपीएचसी, कपिल नगर
• शेंडे नगर युपीएचसी, शेंडे नगर
• बंदे नवाज युपीएचसी
• गरिब नवाज युपीएचसी
• आंबेडकर हॉस्पीटल, कामठी रोड येथे फक्त कोव्हॅक्सीन 
झोन क्र. 10 मंगळवारी झोन
• गोरेवाडा यूपीएचसी, गोरेवाडा वस्ती
• झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती
• इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग
• नारा यूपीएचसी, नारा

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण महिना येतोय, कुलदेवतेची ओटी भरण्याची 'ही' परंपरा माहितीय? 'अशा' पद्धतीने भरा ओटी, ओटीचे साहित्य, महत्त्व जाणून घ्या...
श्रावण महिना येतोय, कुलदेवतेची ओटी भरण्याची 'ही' परंपरा माहितीय? 'अशा' पद्धतीने भरा ओटी, ओटीचे साहित्य, महत्त्व जाणून घ्या...
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींचा भाग्योदय सुरु; फक्त एका राशीवर येणार आर्थिक संकट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींचा भाग्योदय सुरु; फक्त एका राशीवर येणार आर्थिक संकट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Embed widget