नागपूरः गेल्या काही दिवसांपासून घसरणाऱ्या कोरोनाच्या ग्राफने गुरुवारी भरारी घेतली आहे. आज नागपूर जिल्ह्यात दिवसभरात 95 नवे बाधितांची नोंद झाली. यापैकी 7 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 343 बाधित गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या 350 वर पोहोचली आहे.


जिल्ह्यात 350 पॉझिटिव्ह
 
गुरुवारी प्राप्त दैनिक अहवालानुसार शहरात 51 तर ग्रामीणमध्ये 44 नवीन अशा एकूण 95 नवीन कोरोना पॉझिटिव्ह बाधितांची नोंद झाली. तर गुरुवारी एकूण 41 बाधितांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील 24 तर ग्रामीणमधील 17 बाधितांचा समावेश आहे. तर शहरात सध्या एकूण 350 बाधित सक्रिय आहेत.


7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालयात


एकूण 350 अॅक्टिव्ह बाधितांपैकी 7 बाधितांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यात शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सेव्हन स्टार हॉस्पिटल, किंग्सवे हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एक तर मेडीट्रिना रुग्णालयात 3 आणि रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भरती करण्यात आले आहे. तर उर्वरित 343 बाधित गृहविलगीकरणात आहेत.


शुक्रवारी मनपा आरोग्य केन्द्रांमध्ये केवळ कोव्हॅक्सीन


नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी 24 जून रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. 


ज्येष्ठांसाठी बुस्टर डोस उपलब्ध


मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.


वाचा


Nagpur : राजकीय अस्थिरता, मेडिकलमधील रोबोटिक सर्जरी युनिटसाठी निधी; चार आठवड्यांचा वाढीव अवधी


Nagpur Crime : सिगारेटच्या वादातून सेवानिवृत्त जवानाचा गोळीबार, गुन्हा दाखल