Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, पुणे, अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपूर (AIIMS),  बँक ऑफ बडोदा फायनॅन्शियल सोल्यूशन लिमिटेड आणि बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. 


भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, पुणे


पोस्ट : कुशल कारागीर


शैक्षणिक पात्रता - आठवी पास, एक वर्षाचा अनुभव


एकूण जागा  : दोन


वयोमर्यादा : 18 ते  30 वर्ष


अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाऊंड, पुणे – ४११ ००१


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2022


तपशील : www.indiapost.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)



अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपूर (AIIMS)


पोस्ट : वरिष्ठ रहिवासी


शैक्षणिक पात्रता - मेडिकलमध्ये पदव्युत्तर पदवी


एकूण जागा : 22 


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2022 आणि थेट मुलाखत 30 जून 2022 ला होणार आहे.


तपशील :  aiimsnagpur.edu.in 


बँक ऑफ बडोदा फायनॅन्शियल सोल्यूशन लिमिटेड


पोस्ट : रिजनल रिलेशनशीप ऑफीसर, डेप्युटी रिजनल रिलेशनशीप ऑफीसर


शैक्षणिक पात्रता : रिजनल रिलेशनशीप ऑफीसर पदासाठी पदव्युत्तर पदवीसह एक वर्षाचा अनुभव, पदवीधरही अप्लाय करु शकतात. फक्त तीन वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे. डेप्युटी रिजनल रिलेशनशीप ऑफीसर पदासाठी पदवीधर, एक वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.


एकूण जागा : 05


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2022


तपशील : www.bobfinancial.com  ( या वेबसाईटवर गेल्यावर company मध्ये career वर क्लिक करा. current openings  वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)



बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वर्धा


पोस्ट : प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर


सरकारच्या नामनिर्देशनुसार पात्रता हवी.


एकूण जागा : 37 (यात प्रोफेसर पदासाठी 04 जागा, असिस्टंट प्रोफेसरसाठी 24 जागा, असोसिएट प्रोफेसर पदासाठी 09 जागा आहेत.)


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवयाचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षा मंडळ बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पोस्ट बॉक्स नंबर-२५, आर्वी रोड, पिपरी, वर्धा- ४४२००१


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022 


तपशील - www.bitwardha.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर quick links मध्ये careers वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने जाहिरात दिसेल.)