एक्स्प्लोर

Maharashtra Politics: मोठी बातमी: 6 खासदार ठाकरेंची साथ सोडणार?; लवकरच शिंदे गटात करणार पक्षप्रवेश, ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण

Maharashtra Politics: पुन्हा महाराष्ट्रात राजकीय घडामोड घडणार असून शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाली आहे.

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) मोठी अस्वस्थता आहे. अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. दरम्यान ठाकरे गटात मोठी खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडील (Uddhav Thackeray) 6 खासदार शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) संपर्कात असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.  

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची (Shivena Opration Tiger) चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टारगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचदरम्यान शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात. आगामी संसदेच्या अधिवेशनाआधी ही मोहीम फत्ते करण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा ही अनेक दिवसांपासून होती. पण  खासदाराचं तळ्यात मळ्यात सुरू होतं त्याला कारण पक्षांतर बंदी कायदा…या कायद्यातून वाचायचं असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक होतं. अन्यथा फुटीर गटावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकत होती. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी 6 खासदारांचा आकडा महत्वाचा होता. त्यामुळे एकूणच खासदारांचे मन वळवण्यासाठी देखील वेळ घेतला गेला. अशात, अखेर 6  खासदारांचे मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आले असून पडद्यामागं पूर्णपणे जुळणी झाल्याची माहिती आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदारही संपर्कात-

सहा खासदार शिंदे गटात जाण्यास तयार असून लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याचं कळतंय. याला भाजपची देखील शिंदेंना साथ असल्याची माहिती आहे. सोबतच, काही आमदार देखील संपर्कात असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात निर्णय झाला नसल्याची माहिती आहे… 

ठाकरे गटाची साथ खासदार का सोडू शकतात?

- पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता…प्रामुख्याने निधी मिळवण्यासाठी अडचण…केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार महायुतीचं असल्याने त्याचा फायदा 

- पक्ष आणि चिन्हासंदर्भातला मुद्दा गौण…प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं निवडणूक लढली आणि लोकांनी त्यांना स्विकारलं. सोबतच, विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली. शिवसेनेला मोठा विजय...अशात, पक्ष आणि चिन्हाचा मुद्दाच उरलेला नाही.

- केंद्रात भाजपची साथ असल्याने विकास कामांना गती मिळण्यास मदत…सोबतच, निधी मिळण्यास अडचणी नाहीत.

संबंधित बातमी:

Karuna Sharma on Walmik Karad : वाल्मिक कराडने माझ्यावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उगारला, करुणा शर्मांचे खळबळजनक आरोप

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Babanrao Taywade : राज्यातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या अडचणीत, 72 वसतीगृहांची प्रवेशप्रक्रिया रखडली, बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार
राज्यातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या अडचणीत, 72 वसतीगृहांची प्रवेशप्रक्रिया रखडली, बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget