एक्स्प्लोर

पीक विमा भरण्यासाठी उद्या अखेरचा दिवस

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, बँक, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडून अधिसूचित पिकांचा विमा हप्ता भरून नोंदणी करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेची खरीप हंगाम 2018 ची नोंदणी करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. अर्ज करण्याची मुदत उद्या संपत असल्याने शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, बँक, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडून अधिसूचित पिकांचा विमा हप्ता भरून नोंदणी करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज आपले सरकार सेवा केंद्र आणि विमा कंपन्या 31 जुलै 2018 ला रात्री 12 वाजेपर्यंत पोर्टलवर अपलोड करू शकतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि जिल्हा बँकांमार्फत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपला विमा हप्ता रोख/ऑनलाईन/डिमांड ड्रॉफ्टद्वारे 31 जुलै 2018 पर्यंतच बँकेकडे जमा करता येईल. शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपन्यांना पाठवण्याच्या अंतिम तारखा ग्रामिण बँका, व्यावसायिक बँका, खाजगी बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी 9 ऑगस्ट अंतिम तारीख आहे. प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून जिल्हा सहकारी बँकांकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी अंतिम तारीख 9 ऑगस्ट आहे. जिल्हा सहकारी बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी 23 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. 31 जुलैनंतर बँकांमार्फत विमा पोर्टलवर शेतकऱ्यांचा विमा तपशील भरता येणार आहे. ही सुविधा फक्त बँक आणि जिल्हा सहकारी बँकांसाठीच उपलब्ध असेल. पोर्टलवर गावांची नावं मिळत नसतील तर काय? दरम्यान, पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नसतील, पण राज्य शासनाने त्या गावांचे महसूल मंडळ अधिसूचित केलेली असतील तर अशा गावांतील शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकांनी स्वीकारावा आणि वर नमूद केलेल्या तारखांनुसार विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवावा, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकांनी विमा हप्ता 31 जुलै 2018 रोजीच त्यांच्या खात्यातून कपात करून घ्यावा. प्रस्ताव अपलोड करण्याचे काम 23 जुलै 2018 च्या शासन निर्णयातील तारखांप्रमाणे करता येईल. यासंबंधित सर्व सूचना कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीतून नेलं, पण रुग्णालय गाठेपर्यंत होत्याचं नव्हत झालं, सर्पदंशामुळं चिमुकल्याचा अंत, आदिवासी भागातील वास्तव समोर
धक्कादायक! रस्ता नसल्यानं 5 किलोमीटर डोलीतून नेलं, पण रुग्णालय गाठेपर्यंत होत्याचं नव्हत झालं, सर्पदंशामुळं चिमुकल्याचा अंत, आदिवासी भागातील वास्तव समोर
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
नालासोपाऱ्यातील नागेला तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर नागरिकांचा संताप
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर लिखित 'देवाभाऊ' या पुस्तकाचे प्रकाशन

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget