Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची अखेर सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 45 दिवसांपासून वाशी तालुक्यातील कोठावळे पिंपळगाव इथ मजुरांना ओलीस म्हणून ठेवलं होतं. या प्रकरणाची माहिती मिळताच या संदर्भात कामगार विभागाकडे तक्रार करण्यात आली आणि या तक्रारीनंतर अखेर या मजुरांची सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, अचानक हे मंजूर एका एकी गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. तर 3 दिवसाच्या शोधानंतर मजूरांची माहिती मिळाली आणि आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.या प्रकरणी मजुरांना घेऊन येणाऱ्या दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमधील ललितपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यातील हे मजूर असून या मजुरामध्ये 11 पुरुष, 8 महिलांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासह 15 मुलांची यातून आता सुटका करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, थेट उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या बाबत तक्रार दिली असता ही सुटका करण्यात आली आहे.ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र येताच धाराशिवच्या जिल्हाधिकारी यांनी कामगार विभागाला या मजूरांना शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या हालचालींना वेग आले आणि अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
गायीच्या पोटातून काढले तब्बल 18 किलो प्लॅस्टिक, डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया
रायगड जिल्ह्यातील तळा येथे प्लॅस्टिक खाल्लेल्या गायीवर डॉक्टरांकडून यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली असून गायीच्या पोटातून तब्बल 18 किलो प्लॅस्टिक काढून तीला जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तळा शहरातील पुसाटी येथे राहणाऱ्या मंदार पेंडसे यांच्या गायीने प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे तिचे पोट फुगलेले आढलून आले होते. त्यामुळे गायीचे मालक मंदार पेंडसे यांना चिंता वाटू लागल्याने त्यांनी तळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात विचारपूस करून डॉक्टरांच्या सल्याने गायीवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.
त्यानुसार तळा पशुधन विकास अधिकारी डॉ.शिवाजी वाघ, सोनसडे पशुधन विकास अधिकारी डॉ.नितीन जाधव पंचायत समिती सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.रघुनाथ पवार यांनी आपल्या अथक परिश्रमाने गायीवर रुमेनोटॉमी ही शस्त्रक्रिया करून गायीला जीवनदान दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या