वाशिम: स्मशानभूमी म्हणजे मानवी जीवनाला मोक्षप्राप्तीचा शेवटचा मार्ग. स्मशानभूमीत माणसांना केवळ शोक किंवा जीवन मृत्यूचा मुक्तीचा मार्ग म्हणून पाहिल्या जातं. मात्र, याच समशानभूमीत जर लग्न गाठी जुळत असतील तर ऐकायला नवल वाटेल ना? मात्र, होय! वाशिमच्या अनसिंग इथे स्मशानभूमीमध्ये चक्क लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नेमकं हे लग्न कुणाचं आणि का पार पडलं या मागील कारण ही तसेच आहे.
वाशिमच्या (Washim News) अनसिंग मोक्षधाममध्ये मसन जोगी कुटुंबिय अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. मात्र उपेक्षती असलेल्या या समाजाच अक्ख आयुष्य मानवाच्या मारणावरती असून त्यावरच मसनजोगी कुटुंबाला तयावर जगावं लागतं. स्मशानभूमीत असलेल्या विधी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हे कुटुंब आपलं आयुष्य खर्च करतंय. मात्र, याच मसणजोगी कुटुंबियातील ममताच लग्न हिंगोलीच्या ओमप्रकाशशी जुळले. दरम्यान, लग्नसोहळा इतर ठिकाणी करणं शक्य नव्हतं, मग काय गावकऱ्यांच्या परवानगीने विवाह सोहळा स्मशानभूमी पार पडण्याच ठरलं
एकीकडे अंत्यविधीचा कार्यक्रम तर दुसरीकडे विवाह विधी
दरम्यान, अनसिंग गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचा मृत्यू झाला. याच वेळी एकीकडे अंत्यविधीचा कार्यक्रम तर दुसरीकडे विवाह विधीचा कार्यक्रम दोन्हीही विधी विधिवतपणे या मसनजोगी समाजातील लोकांनी आणि पाहुण्यांनी पार पाडल्या. प्रथम अंत्यविधी पार पडला आणि नंतर लग्नविधी पार पडला. तसेच या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थितांनी नववर वधूंना शुभेच्छा ही देण्यात आल्या.
मसनजोगी समाज तस पाहिला तर उपेक्षित समाज म्हणून पाहिला जातो. मात्र या समाजाने स्मशानभूमी सारख्या जागेवर अंत्यविधीनंतर लग्न कार्य अत्यंत विधिवत पद्धतीने पार पाडलंय. एकीकडे हिंदू समाजात स्मशानभूमीतून कुठलेही कार्य पार पाडल्यानंतर स्नान करणे वर्ज मानले जाते. मात्र दुसरीकडे लग्नाची गाठ थेट स्मशानभूमीत जुळलं. अशातच या लग्नाची चर्चा पंचक्रोशी चांगलीच रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या