Kolhapur Crime News: कोल्हापूरमधील (Kolhapur Shooting in the air news) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या उजळवाडीत मोलकरणीच्या अल्पवयीन मुलाकडून हवेत गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गावच्या गल्लीत आणि मोकळ्या माळ्यावर फटाके उडवल्यासारखे दिवसभर अल्पवयीन मुलाने फायरिंग केले.
सदर अल्पवयीन मुलाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल चोरले. त्यानंतर गावातील गल्लीत आणि मोकळ्या माळ्यावर जाऊन फटाके उडवल्यासारखे 34 पेक्षा जास्त राउंड फायर केले. या घटनेनंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून तपास सुरू आहे. तर संबंधित सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या पिस्तूलचा परवाना रद्दसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.
सदर घटनेनं पोलिसही अचंबित-
अवघ्या 13 वर्षांचा मुलगा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन गल्लीत आणि मोकळ्या माळावर दिवसभर फटाके उडविल्यासारखा गोळ्या झाडत होता. त्याने 34 पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या. एखाद्याला गोळी लागली असती तर अनर्थ घडला असता. मात्र भरदिवसा घडलेला हा प्रकार कोणालाच कसा समजला नाही? याबाबत पोलिसही अचंबित झाले.
नेमकी घटना काय?
आईला घरकामाला मदत करण्यासाठी म्हणून सदर अल्पवयीन मुलगा कधी कधी तो जात होता. आपल्या मुलाने रिव्हॉल्व्हर चोरल्याचे मोलकरणीला माहीत नव्हते. अधिकाऱ्याची खोली साफ करण्याच्या उद्देशाने तो त्यांच्या बेडरूममध्ये गेला. ड्रॉवर उघडा दिसताच त्याने ड्रॉवरमधील रिव्हॉल्व्हर खिशात घातले. त्यानंतर समोरच्या भिंतीवर त्याने दोन गोळ्या झाडल्या. त्यावेळी आजूबाजूला गोंदळ आणि स्पीकर चालू असल्यामुळे कोणालाही आवाज आला नाही. त्यानंतर तो गल्लीत आणि मोकळ्या माळ्यावर गेला आणि दिवसभर 34 वेळा हवेत फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लहान वयात याचे ज्ञान त्याला कसे आले, याची चौकशी पोलिसांनी केली. युट्यूबवर आणि सिनेमात पाहून शिकल्याचे त्याने सांगितले.
मुंबईतील भयावह घटना समोर-
मुंबईतील एक धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. भांडुपमध्ये एका 9 वर्षीय शाळकरी मुलीला अज्ञात व्यक्तीने शाळेच्या मैदानातून निर्जनस्थळी नेत इंजेक्शन दिले. भांडुपच्या एका नामांकित शाळेत ही मुलगी शिकत असून 31 जानेवारीला ती शाळेच्या मैदानात खेळत होती. शाळेच्या मैदानात खेळताना एका अज्ञात व्यक्तीने गाठत तिला शाळा परिसरातीलच निर्जनस्थळी नेत इंजेक्शन दिल्याचं मुलीनं सांगितलंनंतर पालकांच्या हृदयाचा ठोका चुकला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकांनी तातडीने मुलीला उपचारासाठी जवळील रुग्णालयात तपासणीसाठी नेलं. भांडुप पोलिसां संपर्क साधत घटनेची कल्पना दिली. या प्रकरणाची दखल घेत भांडुप पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथक नेमली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.