World Cancer Day: कर्करोग हा असा एक जीवघेणा आजार आहे. ज्याचे नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो. जगभरात या आजाराचे अनेक बळी आहेत. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. भारतातही कर्करोग हा एक सक्रिय आजार आहे, ज्याची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. ICMR नुसार, देशात दरवर्षी कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. जागतिक कर्करोग दिन हा दिवस दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1933 मध्ये सुरू करण्यात आला. कर्करोगाच्या उपचारात आयुर्वेदाची कशी मदत होऊ शकते? या दिवसाबद्दल जाणून घेऊया..
जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो?
कॅन्सर असोसिएशनने 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात केली. WHO ने देखील हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली होती, त्यानंतर तो अधिकृत दिवस घोषित करण्यात आला. या भयंकर आजाराबद्दल लोकांना जागरुक करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. कर्करोगासाठी केमोथेरपी आणि वैद्यकीय मदतीची आवश्यकता असली तरी, आयुर्वेदामध्ये कर्करोगापासून बचाव करण्याची क्षमता देखील आहे. आज आम्ही तुम्हाला तज्ज्ञांनी दिलेल्या 5 टिप्स सांगत आहोत, ज्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी प्रभावी आहेत. या टिप्समुळे कॅन्सर बरा होईल की नाही? याबाबत कोणतीही ठोस माहिती नसली, तरी या टिप्सच्या मदतीने कॅन्सरपासून बचाव आणि बरा होण्यास मदत होईल.
कर्करोगपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
आहार - तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. IMCR नुसार डाळी, संपूर्ण धान्य आणि औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरेल.
वजन - तुम्हाला तुमच्या वजनावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, कारण जास्त वजनामुळेही या आजाराचा धोका वाढतो. निरोगी राहण्यासाठी तुम्ही योग आणि ध्यान देखील करू शकता.
दारू आणि धूम्रपान - या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. या दोन्ही पदार्थांमध्ये असे घटक असतात, जे केवळ कर्करोगाला प्रोत्साहन देण्यास सक्षम असतात.
डिटॉक्स - तुम्हाला तुमचे शरीर आतून स्वच्छ ठेवणे देखील आवश्यक आहे. बॉडी डिटॉक्समुळे शरीरातील अंतर्गत अवयव स्वच्छ होतात.
सुका मेवा - सुक्या मेव्यांचा आहारात समावेश करा. काजू आणि बिया नियमित खाल्ल्याने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते.
हेही वाचा>>>
Fitness: PM मोदी यांच्या फिटनेसचं 'हे' रहस्य! फार कमी लोकांना माहीत, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )