Jaya Bachchan On Mahakumbhmela 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा 2025 (Mahakumbhmela 2025) सुरू आहे. या कुंभमेळ्यात 29 जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. यात किमान 30 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याची सूत्रांनी दिली होती. यानंतर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जय बच्चन (Jaya Bachchan) यांनी काल (3 फेब्रुवारी) महाकुंभमेळाव्याबाबत मोठं विधान केलं आहे.
महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदीत फेकलं, असा दावा जया बच्चन यांनी केला आहे. तसेच महाकुंभच्या नियोजनावरुनही जया बच्चन यांचा केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. महाकुंभमेळ्याच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी ज्या भाविकांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले. ज्यामुळे ते पाणी प्रदुषित झालं. आजही विचाराल की सर्वाधिक दुषित पाणी कुठे तर ते महाकुंभमेळ्यात आहे. कारण त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही, असंही जया बच्चन म्हणाल्या. जया बच्चन यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जया बच्चन नेमकं काय म्हणाल्या?
मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने पाणी दुषित झालं आहे. हे पाणी लोकांपर्यंत तसंच पोहचतं आहे. तसंच लोकांचं लक्ष या घटनेकडून विचलित व्हावं म्हणून काळजी घेण्यात आली. मृतदेहांचं शवविच्छेदन होऊ दिलं नाही. ज्या भाविकांचा मृत्यू झाला ते मृतदेह थेट पाण्यात फेकण्यात आले. तसेच उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सामान्य लोकांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली जात नाहीय, अशी टीका जया बच्चन यांनी यावेळी केली.
29 फेब्रुवारीला मध्यरात्री 1 वाजता प्रयागराजमध्ये काय घडलं?
महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभमेळ्याची सुरूवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि 'अदृश्य सरस्वती' नदीच्या संगमावर येत आहेत.
संबंधित बातमी:
Kumbhmela 2025: कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, मध्यरात्री 1 वाजता प्रयागराजमध्ये काय घडलं?