एक्स्प्लोर

एनडीएत फुट पडणे अयोग्य, शिवसेना एनडीएमध्ये पाहिजे : रामदास आठवले

बाळासाहेबांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला साथ सोडावी, असेही आठवले म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुढच्या वेळी होऊ शकेल. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद आणि चांगली खाती घेऊन सरकार बनवावे, असेही आठवले म्हणाले.

नवी दिल्ली : एनडीएमध्ये जी फुट पडली आहे ती बरोबर नाही. शिवसेना ही एनडीएमध्ये असली पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. महाराष्ट्रामध्ये 225 जागा मिळायला पाहिजे होत्या. पण आपापसात दोन्ही पक्षांच्या बंडखोरीमुळे चाळीस-पन्नास जागांचा फटका बसला हे मी बैठकीत सांगितलं, असेही आठवले एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. बाळासाहेबांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला साथ सोडावी, असेही आठवले म्हणाले. मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुढच्या वेळी होऊ शकेल. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद आणि चांगली खाती घेऊन सरकार बनवावे, असेही आठवले म्हणाले. महाराष्ट्रामध्ये सगळं व्यवस्थित होणार आहे, असे अमिक शाह मला म्हणाले आहेत, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात आम्हाला 220 च्या वर जागा यायला हव्या होत्या. भाजपला 120 ते 125 जागा मिळाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. शिवसेनेची ही भूमिका योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवणे ही शिवसेनेसाठी घातक आहे. ही बाळासाहेबांना आदरांजली ठरणार नाही. मुख्यमंत्रीपद देण्याबाबत भाजपकडून आश्वासन दिलेलं नाही, असेही आठवले म्हणाले. काँग्रेस अजूनही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार नाही. त्यामुळे शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि सरकारमध्ये समाविष्ट व्हावं, म्हणजे राज्यातील सध्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देता येईल, असेही ते म्हणाले. एनडीएच्या बैठकीत शिवसेनेविषयी चर्चा झाली नाही. मी बैठकीत शिवसेनेला सोबत घेण्याविषयी चर्चा केली, असे आठवले म्हणाले. भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सरकार आजिबात टिकणार नाही, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा, एकनाथ शिंदेंचा संजय दिना पाटलांना सल्ला
पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा, एकनाथ शिंदेंचा संजय दिना पाटलांना सल्ला
मयंक लोहार मृत्यूप्रकरणी रेल्वे प्रवाशांमध्ये संताप, सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह, रेल्वे पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी
मयंक लोहार मृत्यूप्रकरणी रेल्वे प्रवाशांमध्ये संताप, सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह, रेल्वे पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी
सत्तेत असून सरकारच्या चुका दाखवून देण्यासाठी हिंमत लागते, निलेश राणेंचं कौतुक करावे तेवढं थोडं : रोहित पवार 
सत्तेत असून सरकारच्या चुका दाखवून देण्यासाठी हिंमत लागते, निलेश राणेंचं कौतुक करावे तेवढं थोडं : रोहित पवार 
Mehul Lohar on Mayank Lohar : आज माझ्या भावाला ट्रेनमध्ये मारलं, उद्या ..., मयांकचा भाऊ काय म्हणाला?
आज माझ्या भावाला ट्रेनमध्ये मारलं, उद्या ..., मयांकचा भाऊ काय म्हणाला?

व्हिडीओ

Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
Dharashiv : शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 
शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
Embed widget