एक्स्प्लोर

शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे बहुतांश नेते सकारात्मक, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार

शिवसेनेबरोबर जाण्याबाबत प्रत्येक नेत्याला काय वाटतं याची चाचपणी शरद पवारांनी आजच्या बैठकीत केली. बहुतांश नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत आग्रही भूमिका मांडल्याचे समजते. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत आता वेगाने हालचाली होण्याची शक्यता आहे. उद्या शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

पुणे : शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे बहुतांश नेते सकारात्मक असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादीची बैठक आज पुण्यात झाली. या बैठकीनंतर महाशिवआघाडीचं सरकार स्थापण्याच्या हालचाली वेगाने होणार असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या आठवड्यात सरकार लवकर स्थापण्याच्या संदर्भात दिल्लीत बैठका होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत शरद पवारांनी प्रत्येक नेत्याचे मत जाणून घेतलं. शिवसेनेबरोबर जाण्याबाबत प्रत्येक नेत्याला काय वाटतं याची चाचपणी शरद पवारांनी आजच्या बैठकीत केली. बहुतांश नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत आग्रही भूमिका मांडल्याचे समजते. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत आता वेगाने हालचाली होण्याची शक्यता आहे. उद्या शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीत काँग्रेसनेही शिवसेनेबरोबर जाणं का गरजेचं आहे हे पवार सोनिया गांधी यांना पटवून देण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे. लवकरात लवकर एक पर्यायी सरकार देणार : नवाब मलिक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून लवकरात लवकर एक पर्यायी सरकार देण्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोचलो आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली. कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही कॉंग्रेससोबत आघाडी करुन लढलो होतो त्यामुळे कॉंग्रेससोबत चर्चा करुन पर्यायी सरकार देण्याबाबत विचारविनिमय झाला.या बैठकीत महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान उद्या सोमवारी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीमध्ये बैठक घेणार आहेत. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॉंग्रेसचे नेते यांची मुंबईमध्ये बैठक होणार असून यामध्ये चर्चा करुन पुढे काय करायचे आहे याची भूमिका ठरवली जाणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते. शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक उद्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार की नाही हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका पार पडल्या आहेत. तिन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आहे. या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा प्राथमिक अहवाल तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आला आहे. अहमद पटेल यांच्यामार्फत सोनिया गांधी यांच्याकडेही हा अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर उद्याच्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या विचारसरणीचे हे पक्ष असल्याने सत्ता स्थापनेपूर्वी सर्व मुद्द्यांवर चर्चा करुण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करणे गरजेचं होतं. त्यामुळेच सर्व विषयांवर चर्चा करुन सत्ता स्थापन करण्यास उशीर होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र तिन्ही पक्षांमध्ये सुरु असलेली चर्चा सकारात्मक असल्याची माहिती तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाशिवआघाडीचं सरकार राज्यात येण्याची अपेक्षा जनतेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Water supply news: मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Mumbai Water supply news: मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
Embed widget