LIVE : पाऊस अपडेट : मुंबईच्या समुद्रात मच्छिमारांची बोट अडकली

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
औरंगाबाद - जालना रोडवर वाहतूक कोंडी, पावसामुळे वाहनांच्या रांगा
टिटवाळा : कल्याण-मुरबाड रस्त्यावरील रायत्याचा पूल वाहतुकीसाठी बंद, अतिवृष्टीमुळे उल्हास नदीची पातळी वाढल्याने निर्णय
मुंबई ट्रेन अपडेट : पश्चिम रेल्वे - 10-15 मिनिटं उशिरा, मध्य रेल्वे - 20-25 मिनिटं उशिरा, हर्बर रेल्वे - 20 मिनिटं उशिरा
कोयना धरणाचे दरवाजे आणखी अर्ध्या फुटाने उघडले, 16 हजार क्युसेक्सने पाणी विसर्ग, धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ
नाशिक - भर दुपारी कसारा घाट धुक्यात हरवला, वाहतूक धीम्या गतीने सुरू, मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी ते कसारा प्रवास करणाऱ्या वाहनांना धुक्याचा अडसर
पावसामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी क्रमांक 27 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत 50 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय विमानं दिल्लीला वळवण्यात आली आहेत.

पर्याय म्हणून रनवे 24 चा वापर केला जातो. अनेक देशांतर्गत आणि परदेशी विमानांची उड्डाण रद्द केली आहे.
भिवंडीत नदी नाका, भंडारी कंपाऊंड, गैबीनगर, मंडई गोपालनगर या सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

मुंबईत किती किमीचा ढग कुठपर्यंत आलाय याची माहिती घेतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई विमानतळावरची मुख्य धावपट्टी संध्याकाळी सहापर्यंत बंद, लांब पल्ल्याच्या विमानसेवेवर परिणाम

अहमदनगर : भंडारदरा, निळवंडे, आढळा, खैरी आणि सीना इत्यादी धरणं ओव्हरफ्लो, मुळा धरण भरण्याच्या मार्गावर
मुंबईच्या समुद्रात मासेमारी करणारी बोट अडकली, 137 नॉटिकल मैल अंतरावर अडकलेल्या सीगल बोटीवर 14 जण अडकल्याची माहिती

अहमदनगर : जिल्हात वार्षिक सरासरीच्या सव्वापट पाऊस, कोपरगाव वगळता सर्व तालुक्यात पावसाची शंभरी, मुळा धरण 92 टक्के भरलं
अहमदनगर : निळवंडे धरणातून 22,700 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, प्रवरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नवी मुंबई : पावसामुळे रस्ता, सानपाडा रेल्वे फ्लायओव्हरखाली पाणी, इंजिनमध्ये पाणी गेल्याने वाहनं बद, प्रवाशांचे मोठे हाल

हवामान खात्याकडून कुठल्याही वादळाची सूचना नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मुंबई मनपा उपायुक्त सुधीर नाईक यांचं आवाहन

वसई : पावसामुळे मैत्री शाह या 17 वर्षीय कॉलेज तरुणीचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू, बोरीवली आणि दहीसर स्टेशनदरम्यानची घटना
मुंबई : पाणी तुंबल्यामुळे एसव्ही रोडवरील वाहतूक लिंकिंग रोडवरुन वळवण्यात आली
मुंबई : वरळी सी लिंक, पेडर रोड आणि सायन पूल वाहतुकीसाठी खुला
मुंबई : आरे कॉलनीचा पुल वाहतुकीसाठी बंद, रोड नंबर 3 वरुन वाहतूक वळवली
मुंबईत पाणी भरु नये यासाठी आमची पथकं तयार आहेत. पम्पिंग स्टेशन, कर्मचारी डयूटीवर तैनात आहेत. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा : महापौर

पुणे : मुळा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने नदीपात्रात पाणी शिरलं, त्यामुळे पार्क केलेल्या गाड्या पाण्यात वाहायला लागल्या
ठाणे : मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, स्थानकांवर गर्दी, प्रवाशांचे हाल
मुंबई : अंधेरी परिसरात पुन्हा पावसाला सुरुवात
कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे राधानगरी, दूधगंगा, पाटगाव धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग; पंचगंगा, भोगावती नद्यांच्या पातळीत वाढ
पालघर : पावसामुळे अनेक भागात रस्त्यावर झाडं पडली; घरांचं नुकसान, वीज पूर्णपणे खंडित, वाहतूकही विस्कळीत

दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, मरीन ड्राईव्ह, महालक्ष्मी, ताडदेवमध्ये जोरदार पाऊस
दक्षिण मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात; मरिन ड्राईव्ह, महालक्ष्मी, ताडदेव, परेलमध्ये मुसळधार

ठाणे : ट्रान्सहार्बर लोकल मार्गावरील ठाणे-पनवेल रेल्वे वाहतूक ठप्प, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या थांबवल्या

गेल्या 24 तासांत मुंबईतील पावसाची आकडेवारी

वसई-विरार : नालासोपाऱ्यात पावसाचा बळी, तरुण बाईकसह पुराच्या पाण्यात वाहून गेला, नावाले तलावात मृतदेह सापडला

उल्हासनगर : वालधुनी नदी धोक्याच्या पातळीवर, नदीला प्रचंड प्रवाह, उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये रस्त्यावर पाणी साचलं

विरार : नालासोपारा कारशेडजवळ ट्रॅकजवळ पाणी साचलं, लांब पल्ल्याच्या गाडया 5 ते 6 तास उशिराने, तर सौराष्ट्र एक्स्प्रेस रद्द, राजधानी एक्स्प्रेस, गरीब रथ दोन तास उशिराने

विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम मार्गावरील सर्व लोकल गाड्या अर्धा तास उशिराने

आज सर्वपित्री आमावस्या आहे. पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस असल्याने धार्मिक विधींसाठी भाविकांची धावपळ सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमधील गोदाकाठ पाण्याखाली गेला आहे. परिणामी धार्मिक विधी रस्त्यावर करण्याची वेळ आहे. केशार्पण, पिंडदान रस्त्यावर सुरु आहे. यामुळे रामकुंडावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वसईचा एव्हरशाईन रोड पाण्याखाली, एसटीसह रिक्षाही बंद असल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत जावं लागत आहे

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना आज सुट्टी, पावसामुळे दक्षता म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्णय
कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले, धरणातून 11 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा: राज्यभर सुरु असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, बहुतेक सर्व धरणं भरली आहेत.
कोयना सामडूम
साताऱ्यातील कोयना धरण भरण्यासाठी आता अवघा एक टीएमसी पाणी कमी आहे. कोयना धरणात 104.17 टीएमसी पाणी साठा आहे. धरण क्षेत्रात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पायथा विद्युत गृहातून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे.
कुठल्याही क्षणी धरणाचे सहा दरवाजे उघडणार असल्यामुळे, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विरार पश्चिम स्टेशन रोड पूर्णपणे पाण्याखाली, रस्त्यावर गुडघाभर पाणी, नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी
इस्टर्न फ्री वे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत, हाजी अली जंक्शन, पेडर रोड, वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक सुरळीत, मिलन सबवे सुरु पण पाणी साचल्याने पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन
दादर-परेलमध्ये पाणी साचलं, तर मालाडमध्ये अर्धी बस पाण्याखाली,

गुजरातची मासेमारी बोट रत्नागिरी किनाऱ्यावर भरकटली, बोट वाळूत रुतल्याने स्थिरावली, खलाशांना सुरक्षित बाहेर काढलं
सायन ब्रिज बंद, जेव्हीएलआरवर नजास डेपोजवळ पाणी भरलं, वांद्रे लिंकिंग रोडवरही पाणी
विरार पश्चिम स्टेशन रोड पूर्णपणे पाण्याखाली, रस्त्यावर गुडघाभर पाणी, नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी
पश्चिम महाराष्ट्र, मराठावडा आणि विदर्भातही पावसाची संततधार, साताऱ्यातील कोयना धरणात झपाट्याने वाढ, कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले, उजनी आणि जायकवाडीही भरलं
मनमाड येथून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस नाशिकपर्यंत सोडणार, चाकरमान्यांच्या मागणीमुळे रेल्वेचा निर्णय, पावसामुळे गोदावरी एक्सप्रेस रद्द झाली होती
मुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे. अद्यापही हे पाणी न ओसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळतेय.
तर एअर इंडियानं सकाळी 7 वाजेपर्यंतच्या सर्व फ्लाइट्स रद्द केल्या आहेत.
तर दुसरीकडे येत्या 24 तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.

मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस रद्द
मनमाड येथून सुटणारी राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस ही गाडी मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली आहे.
विमान सेवा विस्कळीत
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळं एकूण 74 विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावरून भारतातल्या इतर ठिकाणी उड्डाण घेणाऱ्या दुपारी 12 वाजपर्यंतच्या 34 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर 14 फ्लाईट्स उशिरानं आहेत.

मुंबईवरून दिल्लील्ला जाणाऱ्या 5 विमान उड्डाण रद्द झाल्यात तर 4 फ्लाईट्स उशिरा आहेत.. मुंबई-बँगलोर, मुंबई-अहमदाबाद आणि चेन्नईसाठी उड्डाण घेणाऱ्या फ्लाईट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबईतून परदेशात उड्डाण घेणाऱ्या 19 फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत.

तर एअर इंडियाची सकाळी 7 वाजेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

मुंबईतील शाळा बंद
जोरदार पावसामुळं आज मुंबई आणि उपनगरातल्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे स्वतः शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी याबाबतची घोषणा केली. हवामान विभागानं येत्या २४ तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं शिक्षण विभागातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार
तिकडे कोकण किनारपट्टीवरही जोरदार पावसानं हजेरी लावली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासून पावसाचं पाणी आलं होतं. त्यामुळे माणगाव खोर्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनाही या पाण्यामुळे खोळंबून राहावं लागलं. तर तिकडं रत्नागिरी आणि रायगडला जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे.
पुण्यातही जोरदार पाऊस
तिकडे पुण्यातही काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या जोरामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्यसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.

कोल्हापुरात मुसळधार
कोकणापाठोपाठ कोल्हापुरातही तुफान पाऊस पडला. राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले असून 12 हजार क्सुसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या 4 तासात काल राधानगरी धरणक्षेत्रात 80 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

साताराऱ्या धुवांधार
तर तिकडे साताऱा जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस बरसला... महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात जोरदार पाऊस झाला.
कोयना धरणात झपाट्यानं पाण्याची वाढ झाली. कालच्या पावसामुळं दीड टीएमसीनं पाणीसाठा वाढलाय. सध्या कोयनेत 91 टीएमसी पाणीसाठा आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.