LIVE: मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर पाहायला मिळत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात रात्री जोरदार पाऊस बरसला. तर डोंबिवली, कल्याण शीळफाटा भागात वीजांचा गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.
तर नवी मुंबईतल्या ऐरोली भागात मुसळधार पाऊस झाला.
मुंबई मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कल्याण-डोंबिवलीत पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक 10-15 मिनिटं उशिराने सुरु आहे.
अंबरनाथ-बदलापूरमध्ये पहाटेपासून संततधार पाऊस सुरु आहे. बदलापूरमध्ये - रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
साताऱ्या जिल्ह्यात महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती होता-होता टळली. कारण, कालपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे फलटण-बारामती रस्तावरचा 60 फूट लांब सोमंथळी पूल वाहून गेला. मात्र, वेळीच स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानं त्यांनी या पुलावरची वाहतूक रोखून धरली. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, हा पूल वाहून गेल्यानंतर राजाळे पुलावरुन जाण्याच्या प्रयत्न करणारे २ दुचाकीस्वार वाहून गेल्याची माहिती आहे. साताऱ्यातील दुष्काळी पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसतोय. तासवडे ते बेलवडे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे 15 घरांवरचं छप्पर उडाले आहेत.

पंढरपूरच्या सखल भागात पुराचा धोका
पंढरपूरच्या सखल भागात पुराचा धोका
उजनी धरणातून ७० हजार क्यूसेक आणि वीर धरणातून सोडलेल्या १५ हजार क्युसेक विसर्गामुळे पंढरपूर शहराच्या काही सखल भागास पुराचा धोका निर्माण झाला आहे.
परिसरात पाऊस पडत असल्याने हे सर्व पाणी मोठ्या प्रमाणात चंद्रभागेत मिसळत आहे.
आज दुपारपर्यंत नदीमध्ये जवळपास लाखभर क्युसेक पाणी येण्याची शक्यता असल्याने, नदीकाठची गावं आणि शहरातील काही भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
मराठवाड्यातील धरणं हाऊसफुल्ल
सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्यावर वरूण राजाने कृपादृष्टी दाखवली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सलग मराठवाड्यातल्या सर्वच जिलह्यात पाऊस बरसतोय.

बीड, लातूर, उस्मानाबाद या दुष्काळी जिल्ह्यावर तर पावसाची खासच मर्जी आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 90 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे छोटी-मोठी धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. धबधबे ओसंडून वाहत आहेत.

सोयाबीनच्या पीकांना चांगली फळधारणा झाली आहे. रबी जोमदार येणार आहे. शेतकरी राजा आनंदला आहे.

दहा वर्षानंतर सलग दुसऱ्या वर्षी समाधानकारक पाऊस पडण्याचं हे आनंदी वर्षे आहे. विशेषत: जिथे जलयुक्तची कामे झाली आहेत तिथल्या नद्या, नाल्या भरून गेली आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, लातुर आणि जालना या आठही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
नगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, बेलवंडी, पारनेर , नगर तालुका आणि राहुरी तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. पावसानं बेलवंडी परिसरासह काही ठिकाणची बत्ती गूल झाली.
पावसानं शहरात सखल भागात पाणीच पाणी तर ग्रामीण भागात ओढ्या नाले ओसंडून वाहू लागले.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.